शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

वादळी पावसाचा नांदगावला तडाखा, शेकडो नारळांची झाडे जमीनदोस्त, छप्पर व पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 3:45 AM

वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत.

मुरुड / नांदगाव : वादळी वा-यासह शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत प्रचंड नुकसान झाले आहे. नांदगाव तसेच माजगाव या गावांत घराची छप्परे व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच नारळ व सुपारीच्या बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे.शुक्र वारी दुपारनंतर सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाºयामुळे परिसरातील शेकडो नारळ व सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर काही झाडे खोडातून तुटून घरांवर, रस्त्यांवर पडली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. नांदगाव भागात नारळ व सुपारीच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वादळी वाºयाचा मोठा फटका येथे सहन करावा लागला आहे. तीनशेहून अधिक नारळाची झाडे तर सुपारीच्या झाडांची पडझड झाली आहे. नांदगाव येथील रस्त्यावर उभे असलेले वायरमन संजय जाधव यांच्या कारवरही नारळाचे मोठे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. नांदगावातील रहिवासी दीपक खोत यांच्या बागायत जमिनीतील ४० सुपारींची झाडे, तर ३ नारळांची झाडे जोरदार वाºयामुळे उन्मळून पडली आहेत. उपसरपंच जितेंद्र दिवेकर, घोले यांच्या बागायत जमिनीवरील झाडेही पडली आहेत.फणसाड अभयारण्यालाही जोरदार वाºयाचा फटका सहन करावा लागला आहे. याबाबत माहिती देताना वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी सांगितले की, अभयारण्यातील दोन विजेचे पोल पडल्यामुळे सर्व परिसर अंधारात आहे. अरण्यातील बहुतेक झाडे मधोमध तुटली आहेत. उसरोळी-सुपेगाव रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. नांदगाव येथून मुंबईकडे जाणाºया रस्त्यावरही झाडे पडली होती.वादळी वारा व पावसामुळे भात पिके पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. काही शेतकºयांनी कापणी सुरू केल्याने त्यांची तारांबळ उडाली. नांदगाव व आजूबाजूच्या भागात शुक्र वारी ४ वाजता गेलेली वीज शनिवार संध्याकाळपर्यंत आली नव्हती. पाऊस पडल्याने उकाडा आणखी वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नांदगाव परिसरातील वादळी वाºयाचा ताशी वेग हा १२० ते १५० कि.मी. इतका होता. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवेचा वेग वाढला. परतीचा पाऊस असा पडत नाही. वेगवान वारे वाहिल्याने या भागात प्रचंड नुकसान झाल्याचे या वेळी भूगोलातील तज्ज्ञ शिक्षक विजय बनाटे यांनी सांगितले.संपूर्ण पावसात जेवढे पंचनामे झाले नाहीत, ते एका दिवसात पडलेल्या वादळी वारे व पावसामुळे झाले आहेत. नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील दांडे, नांदगाव, खारीकवाडा, अदाड व वाळवंटी अशा परिसरात घरांचे नुकसान होऊन ३९ लोकांचे पंचनामे करण्यात आले असून, किमान दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले आहे.- दिलीप यादव,नायब तहसीलदार, मुरुडआठवडाभर जिल्ह्यात कडक ऊन पडले होते. पारा चांगलाच चढला होता. दोन दिवसांपूर्वी भिरा येथे ३६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असताना, पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना सुखद गारवा अनुभवला.

टॅग्स :Raigadरायगड