माणगाव : २०२० मध्ये जागतिक कोरोना महामारीचे संकट जगावर पसरले. या काळात नागरिकांत सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती झाली असून विविध ऑनलाईन योग प्रशिक्षणास प्रतिसाद मिळत असून यामध्ये उत्तम आरोग्याचा मंत्र देणाऱ्या योगासन प्रशिक्षणांना लोकांचा सहभाग वाढत आहे.कोरोनात उत्तम, सुदृढ आरोग्य हे रोगप्रतिकार करण्याची यशस्वी गुरुकिल्ली मानली जाते. योग, प्राणायाम, व्यायाम यातून शारीरिक व मानसिक सुदृढता वाढली जाते. प्राचीन संस्कृतीत योगाचे असलेले महत्त्व कोरोना काळात वृद्धिंगत होत आहे.विविध योग प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, मंडळे व योग शिक्षकांच्या साहाय्याने अनेक जण घरबसल्या आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्राधान्य देत असून सकाळी, संध्याकाळी व वेळेनुसार चालणाऱ्या या योग वर्गांना महिला, कर्मचारी वर्ग व सर्वसामान्य नागरिकांची पसंती लाभत असून ऑनलाईन चालणाऱ्या या प्रशिक्षणासाठी योजक उत्तम तयारी करून योग वर्ग आयोजन करत असल्याचे दिसते आहे. अंबिका योग कुटीर ठाणे संचलित, शाखा पनवेलचा ऑनलाइन योग वर्ग वर्षभर चालू आहे. त्यामुळे आमचे या काळात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यास खूप मदत झाली. जर या महामारीतून बाहेर पडायचे असेल तर सातत्याने योग साधना करणे गरजेचे आहे.- शैला खडतर, योग अभ्यासिका, पनवेल‘करे योग रहे निरोग’ या उक्तीचा प्रत्यय व फायदा कोरोनाच्या संकटकाळात सर्व भारतीय नागरिकांना झाला आणि त्यापैकी मी एक. लाॅकडाऊनच्या काळात मी योगशिक्षक प्रशिक्षण घेतले आणि मग योगिंग-जाॅगिंग, सूर्यनमस्कार, प्राणायाम, आसने यांचे महत्त्व लक्षात येताच मोबाइलचा वेळ वजा करून मी योगासाठी वेळ देऊ लागले.- अपर्णा जंगम, योग शिक्षिका, माणगावकोरोना महामारी संकटात ऑनलाईन योग वर्गांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उत्तम आरोग्यासाठी व शारीरिक, मानसिक सुदृढता वाढविण्यासाठी योगाचे महत्त्व आहे. यामुळे या काळात योग वर्गांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.- हेमलता आखाडे, योग मार्गदर्शक, खोपोली
कोरोना काळात ऑनलाइन योगाला नागरिकांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 12:39 AM