कर्जत शहरात मद्यपी तरुणांचा धुमाकूळ, जामिनावर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:55 AM2017-11-22T02:55:57+5:302017-11-22T02:56:10+5:30
कर्जत रस्त्यावरून दुपारी ४च्या सुमारास पांढ-या रंगाची स्विफ्ट गाडी ठाणे-मुरबाडकडे निघाली होती. मात्र, या गाडीच्या बोनेटवर एक मद्यपी तरु ण बसून आरडाओरडा करून रस्त्यावरील लोकांचे लक्ष केंद्रित करत होता
कर्जत : कर्जत रस्त्यावरून दुपारी ४च्या सुमारास पांढ-या रंगाची स्विफ्ट गाडी ठाणे-मुरबाडकडे निघाली होती. मात्र, या गाडीच्या बोनेटवर एक मद्यपी तरुण बसून आरडाओरडा करून रस्त्यावरील लोकांचे लक्ष केंद्रित करत होता. दहिवली गावाजवळील उल्हास नदीवर असलेल्या श्रीराम पुलावर ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाने ती गाडी अडवली. त्या वेळी बोनेटवर बसलेल्या मुलाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत रस्त्याच्या मध्यभागी बसत धुमाकूळ घातल्याने, त्या रस्त्यावर २० ते २५ मिनिटे वाहतुकीचा खोळंबा झाला. अखेर पोलिसांनी त्या सहा मद्यपी मुलांवर कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली.
एमएच ०५ एएक्स ७६५१ नंबरची स्विफ्ट गाडी मुरबाडकडे जात होती. या गाडीच्या बोनेटवर बसून एक तरु ण आरडाओरडा करत होता. ही गाडी श्रीराम पुलावर येताच त्या ठिकाणी ड्युटीवर असलेला वाहतूक पोलीस शिपाई सुहास काबुगडे यांनी अडवली. मात्र, बोनेटवर बसलेल्या
तरु णाला ती गोष्ट खटकली. त्याने खाली उतरून रस्त्यावर बैठक मारली व त्या पोलीस कर्मचाºयाला शिवीगाळ करू लागला. त्याचा हा तमाशा २० ते २५ मिनिटे चालू होता. या गडबडीत या रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र दगडे हे वाहतूक पोलीस कर्मचाºयांच्या मदतीला धावले. वाहतूक पोलीस कर्मचाºयाने कर्जत पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या सहा तरु णांना पोलीस ठाण्यात आणले. राकेश पवार, हरीश पवार, देविदास पवार, वैभव थोरात, अंकुश पवार, प्रतीक पवार अशी या मुलांची नावे असून, ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिवळे गावात राहणारे आहेत. या सहा जणांना पोलीस ठाण्यात आणताना, गर्दीचा फायदा घेऊन अंकुश मनोहर पवार आणि प्रतीक दीपक पवार हे निघून गेले.
>पोलिसांत तक्रार
ड्युटीवर कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी सुहास काबुगडे यांना या मद्यपी तरु णांनी शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, म्हणून त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. पोलिसांनी चार जणांना अटक करून त्यांना २० नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी सकाळी प्रतीक पवार आणि अंकुश पवार पोलिसांत हजर झाले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.