शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आमदारांचा दावा खोटा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दुजोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:59 AM

अलिबाग-वडखळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आता एक-एक महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयासोबत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे

अलिबाग : अलिबाग-वडखळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आता एक-एक महत्त्वपूर्ण खुलासे पुढे येत आहेत. हा प्रकल्प करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयासोबत स्थानिक आमदारांनी पुढाकार घेतल्याचा केलेला दावा खोटा ठरला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयानेच एका पत्राद्वारे मध्यंतरी हा खुलासा केला असताना आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखील त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ केंद्र सरकारच्याच योजनेतून साकारण्यात येत असल्याचे समोर आले आहे.अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांचे पर्यटनाचे आवडीचे ठिकाण देखील आहे. अलिबागमधूनच पुढे मुरु ड तालुक्यातील पर्यटनस्थळांकडे जावे लागते. या ठिकाणी देशी-परदेशी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांच्या रु ंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. वडखळपर्यंत या मार्गाचा उपयोग अलिबागसह मुरु ड तालुक्याला होतो. वडखळ-अलिबाग हा दुपदरी असल्याने पुन्हा वाहतूककोंडीचा प्रश्न उभा राहतो. यावर उपाययोजना म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने अलिबाग-वडखळ या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देखील बहाल केला आहे. या मार्गाची ओळख राष्ट्रीय महामार्ग १६६ ए अशी आहे. हा महामार्ग झाल्याने केवळ १२ मिनिटांमध्ये अलिबागहून वडखळला पोचता येणार आहे.अलिबाग आणि मुरु ड तालुक्याच्या विकासात गतिमानता आणणाºया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी श्रेयवाद उफाळून आला होता. या प्रकल्पासाठी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच या मार्गाची मागणी गरजेची असल्याचे केंद्रीय मंत्रालयाला सांगितल्याचा दावा आमदार पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केला होता. जिल्ह्याच्या विकासासाठी शेकाप योगदान देत असल्याचे चित्र या पत्रकार परिषदेतून त्यावेळी अधोरेखित केले होते.अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गासाठी आ.जयंत पाटील यांनी खरेच पुढाकार घेतला, अथवा पत्रव्यवहार केला आहे का ? याबाबत अलिबाग येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांच्या मनात शंका उपस्थित झाली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाबरोबर पत्रव्यवहार करून याची शहानिशा केली.त्यावेळी शेकापचे आमदार पाटील यांनी मागणी केल्याचे अथवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत या महामार्गासाठी बैठक झाली नसल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सावंत यांना लेखी कळवले होते. त्यातच आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नव्याने खुलासा करताना सावंत यांना पत्र देवून आमदार पाटील यांचे या रस्त्याबाबतचे पत्र किंवा त्यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेली बैठक याबाबत कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे कळविले आहे.