दहावी, बारावीच्या परीक्षा १७ जुलैपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 04:06 AM2018-07-14T04:06:40+5:302018-07-14T04:07:05+5:30
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई यांनी माहे जुलै व आॅगस्ट २०१८ मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेबाबतचे नियोजन केले आहे.
अलिबाग : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई यांनी माहे जुलै व आॅगस्ट २०१८ मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेबाबतचे नियोजन केले आहे. त्यानुसार इयत्ता दहावीची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट २०१८ दरम्यान होणार आहे, तर इयत्ता बारावीची परीक्षा १७ जुलै ते ४ आॅगस्ट २०१८ दरम्यान होणार आहे. जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी उरण, पनवेल, कर्जत, खोपोली, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, अलिबाग अशी दहा परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी पनवेल, खोपोली, पेण, अलिबाग, महाड अशी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षा केंद्रांवर इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ३०२३ तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी २८७२ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत, अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. एल. थोरात यांनी दिली आहे.