बोर्लीपंचतन स्मशानभूमीची स्वच्छता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 11:48 PM2019-12-10T23:48:24+5:302019-12-10T23:49:05+5:30
दिघी : बोर्लीपंचतन स्मशानभूमीत कचरा टाकून स्मशानभूमीला डंम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले होते. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने येथील ग्रामस्थांनी ...
दिघी : बोर्लीपंचतन स्मशानभूमीत कचरा टाकून स्मशानभूमीला डंम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले होते. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने येथील ग्रामस्थांनी सातत्याने कचरा हटवण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत ग्रामपंचायतीकडून स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली.
बोर्लीपंचतन हे श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे. गावाला जोडून असणारे दिवेआगर पर्यटनस्थळ व बाजारपेठमुळे बोर्ली गाव चर्चेत आहे. असे असताना येथील स्मशानभूमीत दिसणाऱ्या अस्वच्छतेमुळे अंत्यसंस्काराला येणाºया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असे. गावाचा विस्तार मोठा आहे. मात्र, कित्येक वर्षे ग्रामपंचायतीतर्फे कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी जागा नसल्याने स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे. यामुळे सध्या मोक्ष मिळण्याच्या स्मशानभूमी परिसरात कचरा असल्याने अक्षरश: कचरा डेपोचे स्वरूप आले आहे.
येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतीकडे जाण्यासाठी स्मशानभूमी जोडून रस्ता आहे. याच रस्त्याचा वापर स्थानिक नागरिक करतात. मात्र, रस्त्याला असणाºया स्मशानभूमीत कचरा असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. अंत्यसंस्काराला येणाºया व शेतीकडे जाणाºया नागरिकांना नाक मुठीत घेऊन याच रस्त्यांनी ये-जा करावी लागत असल्याने बोर्लीपंचतन येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती होती. हा कचरा लवकर उचलावा, अशी मागणी स्थानिकांनी ग्रामपंचायतीकडे करताच येथील कचरा वेळेत उचलण्यात आला.
या वेळी स्मशानभूमीतील कचºयाची विल्हेवाट करण्यात आली आहे. याकरिता जनता शिक्षण संस्थेचे विश्वस्त तसेच कार्यकारिणी यांचे सहकार्य लाभले. पुढच्या काळात स्वच्छ गाव, सुंदर गाव होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहावे व डम्पिंगसाठी नवीन जागेचा शोध सुरू असून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. असे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आले.