नागोठणे रेल्वे स्थानकाची साफसफाई
By admin | Published: September 26, 2016 02:17 AM2016-09-26T02:17:38+5:302016-09-26T02:17:38+5:30
स्वच्छता आठवडा कार्यक्रमांतर्गत येथील नागोठणे सर्कल डेव्हलपमेंट रेल्वे - एसटी - जलवाहतूक प्रवासी
नागोठणे : स्वच्छता आठवडा कार्यक्रमांतर्गत येथील नागोठणे सर्कल डेव्हलपमेंट रेल्वे - एसटी - जलवाहतूक प्रवासी संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून येथील रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरात सध्या डेंग्यूचे रु ग्ण सापडल्याने स्थानकात कित्येक महिने भरून ठेवलेल्या पाण्याच्या बादल्या खाली करून त्यात स्वच्छ पाणी भरत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
स्वच्छता चालू असताना स्थानकात असलेल्या प्रवासी महिलांनी स्थानकातील स्वच्छतागृह अनेक दिवस बंद असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने मोरे यांनी सदस्यांच्या सहकार्याने स्वच्छतागृहाच्या परिसरातील झाडेझुडपे काढून टाकण्याची मोहीम पूर्ण के ली. त्या ठिकाणचा बंद असलेला नळपाणीपुरवठा तातडीने चालू करून घेत स्वच्छतागृह चालू करून दिले. अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत गणेश जावरे, सुरेश गायकर आदी सहभागी झाले होते. नागोठणे रेल्वे स्थानकाचे प्रमुख डी. एस. मीना, अश्विन दुबे आदींसह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याचे मोरेंनी सांगितले.