मुरुडमध्ये सफाई कामगारांचे काम बंद , दोन महिन्यापासून मिळाले नाही वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:40 AM2019-02-06T03:40:25+5:302019-02-06T03:40:49+5:30
मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाºयांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने व गाडी चालकांना गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदार आशिष देसाई यांनी वेतन न दिल्याने सर्व सफाई कामगारांनी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन देऊन ठेकेदाराच्या विरोधात मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बंद आंदोलन सुरू केले आहे.
आगरदांडा : मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाºयांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने व गाडी चालकांना गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदार आशिष देसाई यांनी वेतन न दिल्याने सर्व सफाई कामगारांनी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन देऊन ठेकेदाराच्या विरोधात मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी मुरुड शहरातील साफसफाई बंद झाल्याने स्वच्छता प्रश्न गंभीर बनू शकतो.
मुरुड नगरपरिषद हद्दीतील स्वच्छतेचा ठेका गंगोत्री इको.टेक्नो.सव्ही.प्रा.लि. यांना दिला आहे. त्याच्याकडे ३६ कामगार स्वच्छतेचे काम करत असतात. गेले दोन महिने कर्मचारी वेतनाची मागणी करत आहेत. आजपर्यंत कर्मचाºयांना वेतन दिलेले नाही यामुळे कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ७६ वर्षांची आजी सफाई काम करीत आहे. त्या आजींना ही वेतन न दिल्याने आज काम बंद आंदोलन सहभागी व्हावे लागले. ही परिस्थिती पाहून नगरसेवक अविनाश दांडेकर यांनी या ठेकेदाराचा निषेध करून या काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला. सदरचे वेतन त्वरित मिळावे याकरिता कर्मचाºयांनी मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी स्वरु पात निवेदन दिले आहे. याप्रसंगी बांधकाम सभापती अशोक धुमाळ, ज्येष्ठ नगरसेवक अविनाश दांडेकर, पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्वच्छतेबाबत दक्ष असणाºया मुरुड- जंजिरा नगरपरिषदेला शासनाकडून स्वच्छता अभियान अंतर्गत विशेष पुरस्कार प्राप्त झाला. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे सफाई कामगारांना काम बंद करणे भाग पडले आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदरावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. मुरुड नगरपरिषद संबंधित ठेकेदाराला दर महिना बिल अदा केले जाते याप्रकरणी मुरुड नगरपरिषदेचा दोष नसल्याचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनीही सांगितले.