नेरळ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात आलेल्या स्मशानभूमी स्वच्छता अभियान या सामाजिक उपक्रमांतर्गत कबरस्थान स्वच्छतेसाठीही श्रीसदस्यांनी कर्तव्याचे पालन करीत कंबर कसली आहे. या वेळी नेरळ येथील तब्बल २०० हून अधिक श्रीसदस्यांनी सात टन ओला व सुका कचरा गोळा करून नेरळ ग्रामपंचायतीच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून या कचºयाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली आहे.
मागील काही महिन्यांपासून नेरळ येथील कबरस्थानची दयनीय अवस्था झाली होती. कबरस्थानमध्ये हिरवे गवत अवाढव्य वाढले होते. तसेच गवताच्या वेली, पालापाचोळ्यांमुळे कबरस्थान दाट झाडीच्या विळख्यात सापडले होते. या गंभीर परिस्थितीमुळे कबरस्थानमध्ये ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत होता.प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजिक उपक्रमच्वृक्षारोपण, स्मशानभूमी स्वच्छता, कबरस्थान ब्रस्थान स्वच्छता असे अनेक सामाजिक उपक्रम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने श्रीसदस्यांच्या माध्यमातून राबविण्यात येतात.च्श्रीसदस्यांनी स्मशानभूमी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून कबरस्थान स्वच्छ केले. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.