नागोठणे : वारंवार तक्रारी करूनही परिसरातील गंगावणे, चाफेवाडी, वर्णावाडी, वत्सलावाडी, चेराठी, काळकाई आदी भागात हातभट्टीचे व्यवसाय चालूच आहेत. नागोठणे पोलीस ठाण्याने जातीने लक्ष घालून हे अवैध धंदे बंद करावेत. हजारो महिलांचा मोर्चा काढण्यात येईल व त्यातूनही प्रश्न मार्गी न लागल्यास पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसेल, असा इशारा शिहू येथील पेण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष वसंत मोकल यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्याची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अलिबाग, प्रांताधिकारी, तहसीलदार, पेण आणि नागोठणे पोलीस ठाण्यात दिली आहे. नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात हातभट्टीचे धंदे चालू असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. अनेकदा लक्ष वेधूनही ठोस कारवाई झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. या संदर्भात ग्रामपंचायत शिहू यांच्यासह आमच्या शिष्टमंडळाने राज्य उत्पादन शुल्क,अलिबाग कार्यालयाकडे संपर्कसाधला असता,संबंधित यंत्रणेने पोलीस ठाणे हद्दीतील आंबेराई व गांधे या गावात धाडी टाकून दोषींवर कारवाई सुद्धा केली आहे व त्याबाबत वृत्तपत्रांतून त्यांचे आम्ही जाहीर आभार सुद्धा मानले आहेत. आमचे शिहू ग्रामपंचायतीने धोरणात्मक निर्णय घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हद्दीतील बीअर शॉपीमध्ये विदेशी मद्य विक्र ी होत असल्याबाबतची तक्र ार नोंदविल्यानंतर त्यांनी तातडीने येथे कारवाई केल्याने ही अवैध होणारी विक्र ी पूर्णपणे बंद झाली आहे व त्यामुळेच हातभट्टीच्या व्यवसायात तेजी आली असल्याचे मोकल यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. सरपंच भास्कर म्हात्रे, नारायण पाटील यांच्यासह नागरिक, शेकडो महिला माझ्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे वसंत मोकल यांनी सांगितले. भावी पिढीचे नुकसान- नशा येण्यासाठी रासायनिक मिश्रित गोळ्या, स्पिरीट, वनस्पतीची साल, रासायनिक खत आदी वस्तू या गावठी दारूत मिसळल्या जात असल्याने भावी पिढी बरबाद होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहेत. आपण जातीने लक्ष घालून हे अवैध धंदे बंद करावेत असे मोकल म्हणाले. सरपंच भास्कर म्हात्रे,नारायण पाटील यांच्यासह नागरिक माझ्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे वसंत मोकल यांनी सांगितले.
हातभट्टीचे अवैध धंदे बंद करावेत
By admin | Published: August 13, 2016 4:00 AM