शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

रोह्यात मराठा समाजाची बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:34 AM

रोहा बंदच्या हाकेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रोहा : मराठा समाजाने गुरुवारी रोहा बंदच्या दिलेल्या हाकेला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोह्यातील औषधालय, शाळा, बँका सोडून रोहे शहरातील मीना बाजारपेठेसह नगरपालिका परिसरातील बहुतांशी दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीत रोहे शहरासह ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रॅलीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.रोहे शहरातील राम मारुती चौकापासून सकाळी ९ वा. रॅलीला सुरुवात झाली. मीना बाजारपेठेतून नगरपालिकेपर्यंत घोषणांनी परिसर दणाणून केला होता. नगरपालिकेच्या समोर या वेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात मराठा समाजाचे नितीन परब, विजयराव मोरे, समीर शेडगे, विनोद पाशिलकर, महेश सरदार, अमित उकडे, स्नेहा अंब्रे, राजेश काफरे, नीलेश शिर्के, सुजाता चाळके, सारिका पायगुडे, समीक्षा बामणे, सुहास येरूणकर, प्रशांत देशमुख यांच्या समवेत हजारोंच्या संख्येने रोहा तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजाच्या वतीने रोहा बंदमध्ये मोर्चेकऱ्यांनी कोणालाही वेठीस धरू नये, असे सांगण्यात आले होते. मोर्चातर्फे प्रांत अधिकारी रोहा यांना निवेदन देण्यात आले.माणगाव : सकल सर्व मराठा समाजाने गेल्या वर्षा-दीड वर्षांपासून महाराष्ट्रात, देशात एक अभूतपूर्व, शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. मात्र, या संयमाची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आता तरी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी, असे वक्तव्य आमदार सुनील तटकरे यांनी केले आहे.गोरेगाव येथे गावतलाव सुशोभीकरण व भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सुनील तटकरे म्हणाले, मराठा समाजाच्या मूलभूत प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले, त्यामुळे संयमाचा उद्रेक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आता तरी सरकारने गांभीर्याने या संदर्भात उपाययोजना करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.तळा येथे मराठा समाजाचा बंद शांततेततळा : मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्टÑात केलेल्या बंदच्या आवाहनानुसार बुधवारी तळा शहर बाजारपेठ पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. त्या दिवशी बंद शांततेत पार पडला. संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली होती.दुसºया दिवशी २६ जुलै रोजी सकाळी सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते एक त्र येवून तळा शहरात शांततेत मोर्चा काढण्यात आला. त्यात रवि मुंढे (द. रा. शिवसेना प्रमुख), चंद्रकांत राऊत, माजी उपसभापती रेश्मा मुंढे, नगराध्यक्षा नगरसेवक अ‍ॅड. चेतन चव्हाण, नगरसेवक संदीप मोरे, नाना दळवी, विनायक मुंढे, भोसले आदी मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्यानंतर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRaigadरायगड