बिरवाडी : महाड एमआयडीसीतील टेमघर नाल्यातील पाण्याला लालसर रंग प्राप्त झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती महाड येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयातील क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी दिली आहे.महाड एमआयडीसीतील टेमघर नाल्यातील पाण्याला लालसर रंग प्राप्त झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी ७ मार्च रोजी दु. १२.३० वा. पाण्याचे नमुने घेऊन तपासणीकरिता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण येथील प्रयोगशाळेमध्ये पाठविले आहे. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. महाड एमआयडीसीतील १६ कारखान्यांना एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीमध्ये वायुप्रदूषण व जलप्रदूषण केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी नोटिसा बजाविल्या आहेत. यामधील लक्ष्मी आॅर्ग्यानिक्स, निम्बर्स फार्मा या कंपन्यांविरोधात बंदची कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना किमान २५ लाख रु पयांचे बँक हमीपत्र देण्याच्या अटीवर कारखाना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर महाडमधील ३८ हॉटेल्स व्यावसायिकांनी व्यवसायाकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सहमतीपत्र न घेतल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये थ्रीस्टार हॉटेल व्यावसायिकांचाही समावेश आहे. यामध्ये काही हॉटेल व्यावसायिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईनंतर सहमती पत्रासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाची चालू वर्षातील कारवाई लक्षात घेता नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर) हमीपत्राची अटप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना किमान २५ लाख रु पयांचे बँक हमीपत्र देण्याच्या अटीवर कारखाना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाडमधील ३८ हॉटेल्स व्यावसायिकांनी व्यवसायाकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सहमतीपत्र न घेतल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये थ्रीस्टार हॉटेल व्यावसायिकांचाही समावेश आहे.नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत.
महाड एमआयडीसीतील दोन कंपन्यांना बंदची नोटीस
By admin | Published: March 09, 2017 2:27 AM