कापडे-कामथे रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: December 24, 2016 03:16 AM2016-12-24T03:16:46+5:302016-12-24T03:16:46+5:30
तालुक्यातील कापडे-कामथे रस्त्याला खड्डे पडल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. याबरोबरच तुर्भे, बोरजफाटा ते देवळे, करंजे, लहुलसे
पोलादपूर : तालुक्यातील कापडे-कामथे रस्त्याला खड्डे पडल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. याबरोबरच तुर्भे, बोरजफाटा ते देवळे, करंजे, लहुलसे, पितळवाडी ते नानेघोल रस्ता, लोहारे खोंडा इत्यादी रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्यांनी वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून या रस्त्यांची ओळख आहे. या सर्व मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहनकडून एसटी सेवा सुरू आहे. माक्षत्र, हे रस्ते खराब झाल्याने एसटी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. एसटी पंक्चर होण्याचे, तसेच पाटे तुटने अशा घटना वारंवार घडत असून, यामुळे पुढील फेऱ्यांवर परिणाम होऊन ग्रामीण विभागातील जाणाऱ्या गाड्या उशिरा धावतात. तर रस्ते खराब असल्याने खासगी वाहतूक व्यावसायिक एक तर गाडी या गावांना घेऊन जात नाहीत, गेलेच तर भाडे दुप्पट द्यावे लागते. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून, नाहक भर्दंड सोसावा लागत आहे.
तालुक्यातील उमरठ हे ऐतिहासिक गाव आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्र माने पुनित झालेली ही भूमी. या गावाला असंख्य इतिहासप्रेमी भेट देत असतात. गेली अनेक वर्षे हा रस्ता कार्यक्र मापुरता तात्पुरता दुरु स्त केला जात होता. मात्र, नुकताच हा रस्ता आमदार भरत गोगवले यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळबे यांच्या सातत्याने केलेल्या मागणीला यश आले असून, हा रस्ता नरवीर पुण्यतिथी अगोदर मार्गी लागेल. तालुक्यात घागरकोंड धबधबा, मोरझोत, चंद्रगड, कांगोरीगड, देवळे शिवमंदिर, रामवरदायीन, वाकन काळकाई मंदिर, कुडपन आदी पर्यटनस्थळे आहेत. या स्थळांकडे जाणारे रस्ते सुस्थितीत ठेवल्यास पर्यटक मोठ्या संख्येने येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तालुक्यातील बहुतेक रस्ते हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहेत. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
सध्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जाहीर केली आहे. सध्या या योजनेतून उमरठ व महालगूर रस्त्याला निधी उपलब्ध झाला आहे. लवकर या रस्त्याचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.