महलमिऱ्या डोंगरावर ढगफुटी, सहा जण थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:46 AM2018-06-23T02:46:12+5:302018-06-23T02:46:15+5:30

भोगावती नदीचे पात्र गुरुवार सकाळी कोरडे होते. मात्र दुपारी दोननंतर विजांच्या कडकडाटासह महलमि-या डोंगर, वरवणे, वाक्रळ, कामार्ली, शेणे, सापोली, आंबेघर व हेटवणे धरण परिसर ते पेण शहरापर्यंत २३ किमी परिसरात ही पर्जन्यवृष्टी झाली.

A cloud on Mahaliriyya, six people escaped | महलमिऱ्या डोंगरावर ढगफुटी, सहा जण थोडक्यात बचावले

महलमिऱ्या डोंगरावर ढगफुटी, सहा जण थोडक्यात बचावले

googlenewsNext

पेण : भोगावती नदीचे पात्र गुरुवार सकाळी कोरडे होते. मात्र दुपारी दोननंतर विजांच्या कडकडाटासह महलमि-या डोंगर, वरवणे, वाक्रळ, कामार्ली, शेणे, सापोली, आंबेघर व हेटवणे धरण परिसर ते पेण शहरापर्यंत २३ किमी परिसरात ही पर्जन्यवृष्टी झाली. ढगफुटीचा केंद्रबिंदू महलमिºया डोंगर असल्याने पेण शहरापासून ८०० ते १००० मीटर उंचीवरच्या या ढगफुटीने अवघ्या ३५ ते ४० मिनिटात भोगावती नदीची पातळी झपाट्याने वाढली.
प्रवाहात धावटे आदिवासी वाडीवरील पाच जण तर पेण कोळीवाड्यातील तिघे जण असे एकूण आठ जण वाहून गेले. त्यापैकी ६ जण सुखरूप बचावले तर सागर वाघमारे (२३, रा. धावटे) आणि अनिकेत वास्कर (२३, रा. पेण कोळीवाडा) हे बुडाले.
पेणमध्ये गुरुवार २१ जूनच्या पावसाची नोंद १३५.०४ एवढीच झालेली आहे. एकूण ४१६.०७ एवढाच पाऊस पेणमध्ये पडल्याची नोंद झालेली असताना नदीला अचानक आलेला पूर ढगफुटीमुळे होता. येथील महलमिºया डोंगर आणि त्याखाली असलेल्या ग्रामीण परिसरातही मोठा पाऊस झाला. ढगफुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा २३ किमी अंतरापर्यंत होता त्यामुळे उंचावरून आलेल्या पावसाच्या गाळयुक्त पाण्याने अर्ध्या तासात नदी अचानक आक्रमक झाली. नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेले ३ कोळी बांधव व नदीपात्रातून धावटे गावाकडे जाणारे ५ आदिवासी बांधव प्रवाहात वाहून गेले. पेणमधील चार पर्जन्यमापक केंद्रावर पाऊस कमी पडला, तर कामार्ली या केंद्रात ढगफुटीचा परिसर असताना पावसाची नोंद नाही. मात्र एकूण पाच केंद्रावर १३५.०४ मिमी नोंद झाली.
>नागोठणेतील रस्ते जलमय
नागोठणे : ग्रामपंचायतीकडून पावसाळ्याच्या आधी शहरात नालेसफाईची मोहीम राबविण्यात येते. यंदा मोहीम पूर्ण झाल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला जात असला तरी, गुरु वारी दुपारी अडीच ते तीन तास पडलेल्या पावसामुळे काही मिनिटांतच नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने काही भागातील रस्ते जलमय झाले, तर नाल्यांतील पाणी घरात शिरले होते. शहरात काही ठिकाणी गटारांवर अतिक्र मण केल्याने पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे मुसळधार पावसात रस्त्यावरूनच गटाराचे पाणी वाहताना दिसत आहे. पावसामुळे रस्त्यावरून फूट - दीड फूट पाण्यातूनच नागरिकांना जावे लागले. दरम्यान, येथील कचेरी शाळेच्या पटांगणात बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रात गुरु वारी ७४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून, शुक्र वारी सकाळपर्यंत १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
>श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
अलिबाग : जिल्ह्यात चोवीस तासांत श्रीवर्धन येथे सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पेण-१३५,रोहा-१२०, मुरु ड-९५, म्हसळा-९०.४०, अलिबाग-६५, माणगाव-६४, खालापूर-५४, तळा-५०, पोलादपूर-४९, उरण-४०, महाड-३६, सुधागड-३०.५०, पनवेल-२०.२०, कर्जत-७ तर माथेरान येथे ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या प्रमुख नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली आहे, मात्र ती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.

Web Title: A cloud on Mahaliriyya, six people escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.