शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

महलमिऱ्या डोंगरावर ढगफुटी, सहा जण थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 2:46 AM

भोगावती नदीचे पात्र गुरुवार सकाळी कोरडे होते. मात्र दुपारी दोननंतर विजांच्या कडकडाटासह महलमि-या डोंगर, वरवणे, वाक्रळ, कामार्ली, शेणे, सापोली, आंबेघर व हेटवणे धरण परिसर ते पेण शहरापर्यंत २३ किमी परिसरात ही पर्जन्यवृष्टी झाली.

पेण : भोगावती नदीचे पात्र गुरुवार सकाळी कोरडे होते. मात्र दुपारी दोननंतर विजांच्या कडकडाटासह महलमि-या डोंगर, वरवणे, वाक्रळ, कामार्ली, शेणे, सापोली, आंबेघर व हेटवणे धरण परिसर ते पेण शहरापर्यंत २३ किमी परिसरात ही पर्जन्यवृष्टी झाली. ढगफुटीचा केंद्रबिंदू महलमिºया डोंगर असल्याने पेण शहरापासून ८०० ते १००० मीटर उंचीवरच्या या ढगफुटीने अवघ्या ३५ ते ४० मिनिटात भोगावती नदीची पातळी झपाट्याने वाढली.प्रवाहात धावटे आदिवासी वाडीवरील पाच जण तर पेण कोळीवाड्यातील तिघे जण असे एकूण आठ जण वाहून गेले. त्यापैकी ६ जण सुखरूप बचावले तर सागर वाघमारे (२३, रा. धावटे) आणि अनिकेत वास्कर (२३, रा. पेण कोळीवाडा) हे बुडाले.पेणमध्ये गुरुवार २१ जूनच्या पावसाची नोंद १३५.०४ एवढीच झालेली आहे. एकूण ४१६.०७ एवढाच पाऊस पेणमध्ये पडल्याची नोंद झालेली असताना नदीला अचानक आलेला पूर ढगफुटीमुळे होता. येथील महलमिºया डोंगर आणि त्याखाली असलेल्या ग्रामीण परिसरातही मोठा पाऊस झाला. ढगफुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा २३ किमी अंतरापर्यंत होता त्यामुळे उंचावरून आलेल्या पावसाच्या गाळयुक्त पाण्याने अर्ध्या तासात नदी अचानक आक्रमक झाली. नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेले ३ कोळी बांधव व नदीपात्रातून धावटे गावाकडे जाणारे ५ आदिवासी बांधव प्रवाहात वाहून गेले. पेणमधील चार पर्जन्यमापक केंद्रावर पाऊस कमी पडला, तर कामार्ली या केंद्रात ढगफुटीचा परिसर असताना पावसाची नोंद नाही. मात्र एकूण पाच केंद्रावर १३५.०४ मिमी नोंद झाली.>नागोठणेतील रस्ते जलमयनागोठणे : ग्रामपंचायतीकडून पावसाळ्याच्या आधी शहरात नालेसफाईची मोहीम राबविण्यात येते. यंदा मोहीम पूर्ण झाल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला जात असला तरी, गुरु वारी दुपारी अडीच ते तीन तास पडलेल्या पावसामुळे काही मिनिटांतच नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने काही भागातील रस्ते जलमय झाले, तर नाल्यांतील पाणी घरात शिरले होते. शहरात काही ठिकाणी गटारांवर अतिक्र मण केल्याने पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे मुसळधार पावसात रस्त्यावरूनच गटाराचे पाणी वाहताना दिसत आहे. पावसामुळे रस्त्यावरून फूट - दीड फूट पाण्यातूनच नागरिकांना जावे लागले. दरम्यान, येथील कचेरी शाळेच्या पटांगणात बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रात गुरु वारी ७४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून, शुक्र वारी सकाळपर्यंत १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.>श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक पावसाची नोंदअलिबाग : जिल्ह्यात चोवीस तासांत श्रीवर्धन येथे सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पेण-१३५,रोहा-१२०, मुरु ड-९५, म्हसळा-९०.४०, अलिबाग-६५, माणगाव-६४, खालापूर-५४, तळा-५०, पोलादपूर-४९, उरण-४०, महाड-३६, सुधागड-३०.५०, पनवेल-२०.२०, कर्जत-७ तर माथेरान येथे ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या प्रमुख नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली आहे, मात्र ती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.