रायगडचा पालकमंत्री कोण होणार?, CM देवेंद्र फडणवीसांनी घेतली तिघांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:18 IST2025-03-02T16:17:07+5:302025-03-02T16:18:49+5:30
Raigad Guardian Minister: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा घोळ मिटलेला नाही. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

रायगडचा पालकमंत्री कोण होणार?, CM देवेंद्र फडणवीसांनी घेतली तिघांची नावे
CM Devendra Fadnavis News: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील घोळ संपलेला नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. त्यामुळे यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, रायगडचा पालकमंत्री कोणत्या पक्षाचा असेल, या प्रश्नाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगडच्या दौऱ्यावर होते. महाडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना रायगडच्या पालकमंत्रिपदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
शिवसेना,राष्ट्रवादी की भाजप; पालकमंत्री कोणाचा होईल?
रायगडचा पालकमंत्री कोण होणार, शिंदे शिवसेना, भाजप की, राष्ट्रवादी काँग्रेस? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "रायगडचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे काही चिंता करण्याचे कारण नाही."
आदिती तटकरेंची नियुक्ती नंतर स्थगिती
सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आले होते. रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून याबद्दलचा निर्णय प्रलंबित आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. त्या बैठकीबद्दल शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना सांगण्यात आले नव्हते. दरम्यान, सध्या आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यापैकी कोण पालकमंत्री होणार, असा प्रश्न जिल्ह्यातील राजकारणात चर्चिला जात आहे.