एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत दाखल; मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:13 AM2023-07-20T09:13:38+5:302023-07-20T09:16:57+5:30
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या २४ तासांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रायगडमधील इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. याठिकाणी २५० लोकांची वस्ती असून त्यातील १०० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. घटनेस्थळी मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे पहाटेपासूनच पोहचले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इर्शाळवाडी इथं दाखल झाले आहेत. इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.
खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री @mieknathshinde हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी… pic.twitter.com/ipXze5yOZu
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर १०० जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
रात्री नेमकं काय घडलं?
रात्री पाऊस पडत होता, आम्ही सगळे घरात झोपलो होतो. तितक्यात मोठा आवाज झाला, त्यामुळे आम्ही घाबरलो, तातडीनं मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो. बाहेर आलो तेव्हा अनेक घर दरडीखाली गेल्याचे दिसून आले. मोठी झाडे पडली होती. आमचे घर खचले आम्ही तिथून खाली आलो असं या दुर्घटनेत वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.