चेंबुरमधील कोचिंग क्लासच्या बसचा अपघात; दोन विद्यार्थी ठार तर ४८ जण जखमी

By जमीर काझी | Published: December 11, 2022 10:16 PM2022-12-11T22:16:36+5:302022-12-11T23:18:55+5:30

जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर लोणावळ्यातील मॅजिक घाटात ही दुर्दैवी घटना घडली असून जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Coaching class bus accident in Chembur; Two students were killed and 48 others were injured | चेंबुरमधील कोचिंग क्लासच्या बसचा अपघात; दोन विद्यार्थी ठार तर ४८ जण जखमी

चेंबुरमधील कोचिंग क्लासच्या बसचा अपघात; दोन विद्यार्थी ठार तर ४८ जण जखमी

googlenewsNext

अलिबाग : सहलीतून परत येत असताना मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांच्या बस पलटी होऊन दोघे जण ठार तर ४६ विद्यार्थासह ४८ जखमी होण्याची घटना रविवारी रात्री  घाटात घडली. जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर लोणावळ्यातील मॅजिक घाटात ही दुर्दैवी घटना घडली असून जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

सर्वजण दहावीचे विद्यार्थी आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबवर रांगा लागून राहिल्या होत्या.पोलिसांच्या सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली. भारतामध्ये एका मुलीचा समावेश असून दोघांचेही नावे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट समजलेली नव्हती.

चेंबूर येथील मयंक कोचिंग क्लास मध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची आज सकाळी लोणावळा येथे सहल काढण्यात आली होती .४८ विद्यार्थ्यांसमवेत क्लासचे दोन खाजगी शिक्षकही होते. सर्वजण लक्झरी बस (एम. एच.०४- जी पी-२२०४ )  बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात असताना रात्री आठच्या सुमारास जुन्या  घाट उतरताना न मॅजिक पॉईंट जवळ बस डाव्या बाजूला पलटी झाली.

अपघातामध्ये जवळपास सर्व विद्यार्थी जखमी झालेले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली व आजूबाजूच्या परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने हितिका दिपक खन्ना (वय १७ वर्षे, चेंबूर कॅंप) व राज राजेश  म्हात्रे (वय १६ वर्षे, असाल्फा व्हिलेज, लाल डोंगर चेंबूर) जागीच ठार झाले. बसमधील सर्व विद्यार्थी आनंदात गाणी म्हणत असताना अकस्मितपणे झालेल्या अपघातामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट झाली आरडाओरड आणि रडण्यामुळे  गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मार्गावरून जात असलेल्या अन्य वाहनाने तातडीने पोलिसांना कळवून मदत कार्य सुरू केले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ पाठवून मदतकार्य सुरू करण्यात आली. बस हायड्राच्या साह्याने बाजूला घेण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
-सोमनाथ घार्गे (जिल्हा पोलीसप्रमुख रायगड)

Web Title: Coaching class bus accident in Chembur; Two students were killed and 48 others were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात