शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

धबधब्यांवरील बंदीमुळे कर्जतचे व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:10 PM

स्थानिक त्रस्त : जमावबंदी आदेश लागू न करण्याची मागणी

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात गेल्या सहा ते सात वर्षात अनेक पर्यटनस्थळांना कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे येथे दुर्दैवी घटना घडत आहेत. प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि जमावबंदी आदेशामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटन व्यवसाय धोक्यात आले आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्याडोंगर कपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे. वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी आणि अर्थात या सर्वांचा फायदा येथील आषाणे -कोषाणे, कोदींवडे, खांडस मार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, जुमापट्टी, बेकरेयेथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंदझाली.सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. त्यामुळे येथील व्यवसाय तेजीत आला होता. परंतु अति उत्साही पर्यटकांना त्यांच्याच चुकीमुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. परंतु प्रशासनाने यावर उपाययोजना न करता आणि स्थानिकांना विचारात न घेता सतत दोन वर्षे १४४ कलम लागू करून सरसकट बंदी घातली, त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे.या जमावबंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे. नेरळ, कशेळे, कर्जत, खोपोली येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहन चालक यांच्याकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगी भाडे मारून दिवसागणिक २५०० ते ३००० इतकी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १००० रुपये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक, वन समिती, रिक्षा संघटना यांना विचारात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे हॉटेल व्यावसायिक, स्थानिक व्यावसायिकांनी, रिक्षा संघटना यांचे मत आहे.नियोजनाअभावी ओसरला पर्यटन व्यवसायकर्जत तालुक्यात पावसाळी सहलींसाठी पर्यटकांची कमालीची गर्दी होऊ लागली अन् अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी धबधब्यांवर दगड कोसळून, पाण्यात बुडून पर्यटकांचे होणारे मृत्यू चिंतेची बाब तसेच स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, छेडछाडीचे वाढलेले प्रमाण, मद्यप्राशन केल्यानंतर ठिकठिकाणी फोडलेल्या काचेच्या बाटल्या यामुळे क्षणात नावारूपाला आलेल्या या सर्व पर्यटन स्थळांवर शासनाने जमावबंदीचा आदेश काढला. यामुळे येथील स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.पोलीस प्रशासनाने नेरळ परिसरात नाकाबंदी सुरू केली आहे. मद्यपान करून जर कोणी गाडी चालवत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच दारू पिऊन आलेल्या व्यक्तीला अडवून धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात येते, यासाठी ३ अधिकारी व ४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.- सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, नेरळप्रशासनाने स्थानिकांना विचारात न घेता जमावबंदी आदेश लागू करू नये. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन करावे. स्थानिक ग्रामपंचायत, वन कमिटीला घेऊन चर्चा करावी, जेणे करून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच पर्यटकांनीही गैरवर्तवणूक करू नये, स्थानिक आणि प्रशासनाला सहकार्य करावे. जमावबंदी आदेश असाच सुरू राहिल्यास कर्जतमधील पर्यटन विकसित होण्याऐवजी धोक्यातच येईल.- सागर शेळके, हॉटेल व्यावसायिक, डिकसळ