बोर्लीमांडला - अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्रात तालुक्यातील रेवदंडा दोन एलईडी लाइटच्या नौका तटरक्षक दलाने पकडल्या. भारतीय तटरक्षक दलाचे कर्मचारी हे समुद्रात गस्त घालत असताना त्यांना या दोन बोटी दिसल्या. त्यांनी त्या दोन बोटी ताब्यात घेतल्या. या बोटी प्रकाश हरिश्चंद्र बामजी आणि संतोष पोशा कोळी यांच्या आहेत. बोटी मुरूडच्या तटरक्षक दलाकडून रायगडच्या मत्स्यव्यवसाय विभागाने ताब्यात दिल्या आहेत, असे अविनाश नाखवा यांनी सांगितले.समुद्रात मासेमारी करताना रात्रीच्या वेळी खोल एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे लहान-मोठ्या सर्वच प्रकारच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना एलईडीचा वापर करण्यास निर्बंध घालावेत, अशी मागणी येथील मच्छीमार संघटनांनी केली होती. १0 नोव्हेंबर २0१७ ला याबाबतचे परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले. मेरीटाइम बोर्ड आणि तटरक्षक दलाला अशा बोटींवर कारवाईचे आदेश दिले होते.रायगडच्या मत्स्यव्यवसाय विभागाने महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अंतर्गत कारवाई करून या नौकेवरील बसविण्यात आलेल्या ९ एलईडी लाइट (बल्ब) जप्त केले आहेत. नौका सालाव बंदरात अवरु द्ध करून ठेवल्या आहेत. तसेच नौका मालकाविरु द्ध अलिबागच्यचा अभिनिर्णय अधिकाऱ्यांकडे प्रतिवेदन दाखल करण्यात येणार आहे.- अविनाश नाखवा, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय
रेवदंडा समुद्रात दोन नौका तटरक्षक दलाने पकडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 5:00 AM