दांडगुरी : म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या एका वळणावर दिघी पोर्टमधून लोखंडी कॉइल वाहून नेणाºया ट्रेलरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये ट्रेलर रस्त्यालगत असणाºया एका घरामध्ये घुसला. या वेळी प्रसंगावधान राखल्याने घरातील दाम्पत्य थोडक्यात बचावल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.शुक्रवार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महादेव नाक्ती आपल्या खरसई येथील घरामध्ये टीव्ही पाहत असताना त्यांना वाहनाचा मोठा आवाज आला. या वेळी एक ट्रेलर (एमएच १२ पीक्यू ५२१९) त्यांच्या घरावर आदळला. नाक्ती यांनी प्रसंगावधानाने त्यांचे व पत्नीचे प्राण वाचवले. मात्र, या अपघातात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरामध्ये असणारे एक बोकड व दहा कोंबड्या ट्रेलरखाली चिरडल्या गेल्या. अपघातामध्ये चालकदेखील गंभीररीत्या जखमी झाला असून, याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.>अवजड वाहतूक धोकादायकआंतरराष्ट्रीय पातळीच्या दिघी पोर्ट प्रशासनाकडून २० टन क्षमता असणाºया रस्त्यावरु न अवैधरीत्या ४० टनाच्या अतिभाराच्या लोह कॉइल व कोळशाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. ग्रामस्थांकडून वारंवार तक्रार होऊनही प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. मोठ्या कष्टाने घर बांधले असून दिघी पोर्ट येथे सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे आमचा संसार उघड्यावर आला आहे. या प्रकरणी ट्रेलरचालकावर कारवाई करावी.- महादेव नाक्ती, अपघातग्रस्त
दिघी पोर्टजवळ कॉइलचा ट्रेलर घुसला घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:48 AM