घोणसे घाटात दरड कोसळली

By admin | Published: June 20, 2015 11:41 PM2015-06-20T23:41:52+5:302015-06-20T23:41:52+5:30

म्हसळा-माणगाव रस्त्यावर घोणसे घाटात शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. दरड कोसळताना एक वाहन काही अंतरावर असल्यामुळे थोडक्यात बचावले.

The collapse of the Ghonas Ghat collapsed | घोणसे घाटात दरड कोसळली

घोणसे घाटात दरड कोसळली

Next

म्हसळा : म्हसळा-माणगाव रस्त्यावर घोणसे घाटात शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. दरड कोसळताना एक वाहन काही अंतरावर असल्यामुळे थोडक्यात बचावले. दरड कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने रायगडमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असताना अतिवृष्टीमुळे संभाव्य धोके लक्षात घेत जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून विभागाकडे शोध व बचाव पथक, बचाव साहित्य रु ग्णवाहिका आदी सुविधा तत्पर ठेवण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली होती. तसेच प्रशासकीय प्रमुखांनी या काळात परवानगीशिवाय कार्यालय सोडू नये अथवा मोबाइल बंद करू नये अशा मुख्य सूचना जिल्हा अधिकारी रायगड यांच्याकडून असताना देखील यातील एकही सुविधा म्हसळा तालुक्यात निदर्शनास येत नाही.
म्हसळा तालुक्यात मागील तीन दिवस पावसाने थैमान घातले असून आतापर्यंत संपूर्ण पावसाची सरारासरी ५३४.८ मि.ली इतकी आहे. म्हसळा तालुक्यातील काही गावांचा संभाव्य दरड कोसळू शकते अशा यादीमध्ये नाव असतानाही आपत्कालीन सुविधांचे तीनतेरा वाजले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरडग्रस्त गावांसाठी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरड कोसळल्यानंतर रस्ता मोकळा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता यांना संपर्क करण्याच्या प्रयत्न केला होऊ शकला नाही. अखेर पोलीस खात्यातील पोलिसांनी रस्त्यावरील माती व लहान खडी बाजूला करून एकेरी रस्ता सुरळीत केला.

Web Title: The collapse of the Ghonas Ghat collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.