- लोकमत न्यूज नेटवर्कधाटाव : रोहा तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने कुंडलिका नदी सुद्धा तुडुंब वाहत आहे, तर काही ठिकाणी वादळवारा सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. रोहा-कोलाड रस्त्यावर रोठखुर्द गावानजीक जे.एम. राठी स्कूलसमोर महाकाय वडाचे झाड सोमवारी दुपारी अचानक रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडले. यामुळे कोलाड व रोहा बाजूकडील वाहतूक चार तास ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. रहदारीला अडथळा निर्माण झाल्यामुळे लहान- मोठ्या वाहनांच्या अंदाजे २ किमी अंतरापर्यंत रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. रोह्यात रात्रभर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसाने रोहा, कोलाड, चणेरा, खांब, धाटाव, सुतारवाडी यासह इतर परिसराला झोडपून काढले आहे. सोमवारी १७ जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास रोहा-कोलाड रस्त्यावर रोठखुर्द गावानजीक जे. एम. राठी स्कूलसमोर असलेले महाकाय वडाचे झाड अचानक उन्मळून पडले. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
रोहा-कोलाड रस्त्यावर कोसळले झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:30 AM