शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 23:57 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली

रायगड : गणेशोत्सवाचा सण साजरा करण्याची सर्वांनाच घाई झाली असेल, परंतु सण साजरा करण्याआधी जरा थांबा. कारण सरकार आणि प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करताना काही नियम आणि अटी आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी या वर्षी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले आहे. सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करायचीच असेल, तर संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडून आवश्यक ती पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी २९ जुलै रोजी जारी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने यंदा गणेशोत्सव कसा साजरा करावा? गणेशमूर्तीची उंची किती असावी? विसर्जन कधी करावे? हे मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश, तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण याच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित आहे.श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट व घरगुती गणपती २ फुटांच्या मर्यादित राहील, याची दक्षता घ्यावी. या वर्षी शक्यतो गणेशोत्सव कमीतकमी दिवस साजरा करावा, तसेच पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे, मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास, या मूर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षांच्या विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून आगमन विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळणे शक्य होणार आहे.उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागण्यास मनाई असेल. या वर्षी गणपती उत्सवासाठी पर राज्यातून, पर जिल्ह्यातून येणाºया भविकांनी रायगड जिल्ह्यात ७ आॅगस्टपूर्वी दाखल होण्याचे आहे व तद्नंतर १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’ राहण्याचे आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात स्थापित कोरोना प्रतिबंधक ग्राम समिती व मुख्यत्वे करून संबंधित ग्रामपंचायत सरपंच यांची राहील, तसेच शहरी भागात संबंधित मुख्याधिकारी, नगरपालिका, नगरपंचायत यांची राहील.धार्मिक कार्यक्रमांना कमाल १० व्यक्तिंना परवानगी१आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भातील नियमांचे, तरतुदीचे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन अथवा अन्य धार्मिक कार्यक्रमांना कमाल१० व्यक्तिंना परवानगी असेल.२गणेशोत्सवादरम्यान घरगुती गणपतींच्या दर्शनासाठी गृहभेटी देणे टाळावे, तीर्थप्रसादासाठी, महाप्रसादासाठी उपस्थिती टाळावी. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा आॅनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीतजास्त व्यवस्था करण्यात यावी.३ जणेकरून गर्दी कमी होईल. या कालावधीत गणपती मंडळाला भेटी दिलेल्या ठिकाण, कार्यालय, व्यक्ती यांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी, जेणेकरून कदाचित संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोयीचे ठरेल.दिवसातून ३ वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावेगणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची, तसेच सॅनिटायजिंग, थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाºया भाविकांसाठी शारीरिक अंतराचे, तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायजर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, तसेच दिवसातून ३ वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. सार्वजनिक स्थळी विसर्जन करण्यासाठी गर्दी करू नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नये. विसर्जनासाठी प्रत्येकाने वैयक्तिक न जाता, कॉलनी, आळीतले गणपती हातगाडी, ट्रक, टेम्पो आदीमध्ये ठेवून सर्व गणपतींचे फक्त २ ते ३ व्यक्तिंद्वारे विसर्जन करावे.

टॅग्स :Raigadरायगड