शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र रोहा नगरपालिके च्यादफ्तरातून गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:45 AM

रोह्यातील नियमबाह्य इमारत प्रकरण : पर्ल पार्क इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र

मिलिंद अष्टिवकर

रोहा : शहरातील नियमबाह्य इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणास वेगळे वळण लागले आहे. ही इमारत अधिकृत करण्यास प्रमुख अडसर असलेले जिल्हाधिकारी रायगड यांची याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह देण्याबाबतचे रोहा नगरपालिकेला दिलेले पत्र पालिकेच्या दफ्तरातून गायब झाले आहे. परिणामी अनेक तक्रारी झालेल्या पर्ल पार्क इमारतीला मुख्याधिकारी रोहा यांनी दिलेली भोगवटा प्रमाणपत्र संशयाच्या भोवºयात सापडले आहे.

रोहा शहरातील हाफिज बिल्डर यांच्या पर्ल पार्क इमारतीच्या नियमबाह्य बांधकामाविरोधात झालेल्या तक्रारी आणि उपोषणाची दखल रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी घेतली होती. जिल्हाधिकारी कार्यालय नगरविकास शाखेमार्फत रोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून इमारतीच्या आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करून आपला स्वयंस्पष्ट अहवाल अभिप्रायासह तातडीने देण्याची सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आली होती. हे पत्र १९ आॅगस्ट २०१७ रोजी रोहा नगरपालिका कार्यालयास प्राप्त झाले आहे. परंतु जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडील हे पत्र अनेक त्रुटी असलेल्या अनधिकृत बांधकामाला भोगवटा प्रमाणपत्र देऊन अधिकृत करताना अडचणीचे ठरणारे होते. नेमके तेच पत्र नगरपालिके च्या दफ्तरातून गायब झाले आहे. ते पत्र गहाळ अथवा चोरीस गेल्यानंतर यासंबंधित कायदेशीर तक्रार मुख्याधिकारी रोहा यांनी करणे गरजेचे होते, ती त्यांनी केली नाही. दुसरीकडे रोहा नगरपालिकेने माहिती अधिकारात हाफिज बिल्डर यांच्या अनधिकृत कॉम्प्लेक्सबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील कोणतेही पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले नसल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात देऊन या प्रकरणातील गुंता अधिक वाढविला आहे. परिणामी हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. या इमारत संबंधित झालेल्या अनेक तक्रारींची चौकशी न करता, तसेच जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश धाब्यावर बसवत पर्ल पार्कला भोगवटा प्रमाणपत्र देऊन अधिकृत केले. आता जिल्हाधिकारी रायगड यांचे पत्र गहाळ झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे.नगरसेविके ची नगरपरिषद संचालनालयाकडे तक्रारच्नगरसेविका समीक्षा बामणे यांनी संचालक नगरपालिका संचालनालय मुंबई यांच्याकडे रीतसर पत्र पाठवून मुख्याधिकारी रोहा यांची तक्रार केली आहे. त्यामध्ये लियाकत हाफिज यांची जागा पूर रेषेत असल्याने रोहा नगरपालिका मुख्याधिकारी यांनी बिल्डरला १४ जानेवारी २०१६ रोजी कॉम्प्लेक्स बांधकाम परवाना देताना पाटबंधारे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नगरपालिकेकडे सादर केल्याशिवाय इमारतीचे जोत्यावरील बांधकाम करण्यात येऊ नये या अटीवर बांधकाम परवाना दिला होता.च्बिल्डरने ते सादर न केल्याने मुख्याधिकाºयांनी इमारतीचे बांधकाम बंद करण्यासंबंधी ६ जानेवारी २०१७ व १९ जानेवारी २०१७ रोजी नोटीस बजावूनसुद्धा बिल्डरने काम सुरूच ठेवून पूर्णही केले. बिल्डरने वापर परवाना न घेता कॉम्प्लेक्सचा वापर सुरू करून बांधकाम परवान्यातील अटी-शर्तींचा भंग केल्यामुळे बांधकाम परवाना रद्द करावा, अशी तक्रार २६ मे २०१९ रोजी पुराव्यासहित करूनसुद्धा मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी बिल्डरवर कोणतीही कारवाई केली नाही.च्उलट बिल्डरच्या अनधिकृत कॉम्प्लेक्सला मुख्याधिकाºयांनी भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. या अनधिकृत कॉम्प्लेक्सला दिलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द करून रोहा नगरपालिकेच्यामुख्याधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका समीक्षा बामणे यांनी संचालक नगर परिषद संचालनालय यांच्याकडे केली आहे.सदर प्रकरणी जिल्हा नगरविकास शाखेने रोहा नगरपालिकेला पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत तसेच रोहा नगरपालिका यांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या पत्राबाबत नगरविकास शाखेमार्फत चौकशी करण्यात येईल.- डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगडजिल्हाधिकारी रायगड यांचे ते पत्र सापडत नाही आहे, ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू- बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी, रोहा नगरपालिका

टॅग्स :raigad-pcरायगडzpजिल्हा परिषदRaigadरायगड