मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पाे कंटेनरवर आदळला; एकाचा मृत्यू तर तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 02:21 PM2021-06-11T14:21:16+5:302021-06-11T14:27:50+5:30
Accident Case :रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पोला अपघात होवून टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोतील तिघांना किरकोळ दुखापत झाली.
माेहपाडा ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पोला अपघात होवून टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोतील तिघांना किरकोळ दुखापत झाली. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निलंगा लातूरहून पार्सल साहित्याने भरलेला टेम्पो मुंबईच्या दिशेने निघाला असताना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ टेम्पो(क्रमांक एम एच-24,एयु-5831) आला असता पहाटेच्या सुमारास अचानक टेम्पो चालकाला डुलका लागल्याने टेम्पो समोरील कंटेनर वर उजव्या बाजूने धडकला.
या अपघातात टेम्पो चालक भरत मोहन जगदाळे (वय ३१)रा.कासरशिरले,ता-निलंगा,जि-लातूर याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी राजश्री भरत जगदाळे,मुलगी ऋतिका भरत जगदाळे,चुलत भाऊ धनराज सुखपंत जगदाळे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.सदर अपघाताची माहिती मिळताच अमित गुजरे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले.यावेली डेल्टा फोर्सं,आय आरबी कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.यानंतर मयत भरत जगदाळे यांना शवविच्छेदन करण्यासाठी चौक रुग्णालयात नेण्यात आले.याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नापास करण्याची धमकी देत विद्यार्थीनीसोबत शाळेतच शिक्षकांकडून बलात्कार; गर्भवती झाल्यानंतर झाला खुलासाhttps://t.co/dydWChfsgd
— Lokmat (@MiLOKMAT) June 11, 2021