कर्जतमधील चार गावांतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:20 AM2020-11-10T00:20:45+5:302020-11-10T00:20:50+5:30
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव जोडणारे रस्ते जिल्हा परिषदेचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने मिळत नाही.
कर्जत : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पाठपुरावा केला होता. त्या निधीमधून मंजूर झालेल्या चार गावांतील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव जोडणारे रस्ते जिल्हा परिषदेचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने मिळत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या अवस्था बिकट झाली असून, त्याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाने निधी द्यावा, अशी मागणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. ग्रामविकास विभागाने कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते जोडण्यासाठी आणि रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्या निधीमधून मंजूर झालेल्या चार रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आज ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. भूमिपूजन करण्यात आलेल्या चार रस्त्यांच्या कामासाठी ग्रामविकास विभागाने प्रत्येक रस्त्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्या ८० लाख रुपयांच्या निधीमधून चार गावांतील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार
याप्रसंगी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, सभापती सुजाता मनवे, माजी सभापती प्रदीप ठाकरे, शिवसेना जिल्हा सल्लागार भरत भगत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक शिवराम बदे, उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे, परिषद सदस्या सहारा कोळंबे आदी प्रमुख उपस्थित होते. दामत-भडवळ रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी दामत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुभाष मिणमिणे, असगर खोत, गोपीनाथ राणे, माजी उपसरपंच साजिद नजे आदीं उपस्थित होते.