पूरग्रस्तांच्या भरपाईसाठी वचनबद्ध - रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 01:55 AM2019-08-11T01:55:08+5:302019-08-11T01:55:31+5:30
महाड शहरात आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पाहणी केली.
महाड - शहरात आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पाहणी केली. मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील काही भागांतील नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई देण्यास शासन वचनबद्ध असल्याचे या वेळी चव्हाण यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहातील बैठकीत शहरातील पूरपरिस्थिती व नुकसानीचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. या वेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही चव्हाण यांची भेट घेऊन शासनाने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी केली. या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माधव मुंदडा, महेंद्र पाटेकर, मनोहर शेठ, सुभाष शेठ आदी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त व्यापारी, नागरिक व शेतकरी यांना मदत देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कार्यवाही करण्याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सूचना केल्या.