नांदगाव भागात भरपाईची रक्कम त्वरित मिळावी; नारळ, सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:50 AM2020-07-04T00:50:33+5:302020-07-04T00:50:42+5:30

अंकिता दळवी यांची मागणी, याबाबत अधिक माहिती देताना मुरुड तालुक्यातील सर्वात जास्त बागायत जमीन नांदगावमध्ये आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे सुपारीची सर्वाधिक झाडे मुळासकट पडली आहेत

Compensation should be received immediately in Nandgaon area; Huge damage to coconut, betel orchards | नांदगाव भागात भरपाईची रक्कम त्वरित मिळावी; नारळ, सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान

नांदगाव भागात भरपाईची रक्कम त्वरित मिळावी; नारळ, सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान

Next

मुरुड : तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील असंख्य नारळ-सुपारीच्या बागा आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे आमच्या परिसरातील हजारोच्या संख्येने सुपारी व नारळाची झाडे पडली आहेत. वादळ होऊन एक महिना पूर्ण झाला, तरी बागायतदारांना भरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. पैसे येऊनसुद्धा वाटप करण्यास दिरंगाई का? तहसीलदारांनी तातडीने वाटप करावे, अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायत सदस्या अंकिता दळवी यांनी केली आहे. त्या नांदगाव भागातील बगायतदारांचे जे नुकसान झाले आहे, त्याबाबत विस्तृत प्रमाणात माहिती देताना पत्रकारांशी बोलत होत्या.

याबाबत अधिक माहिती देताना मुरुड तालुक्यातील सर्वात जास्त बागायत जमीन नांदगावमध्ये आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे सुपारीची सर्वाधिक झाडे मुळासकट पडली आहेत. ही पडलेली झाडे बागायत जमिनीतून हटविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना मजूर घेऊन मोठा खर्च आला आहे. त्याचप्रमाणे, सुपारीचे पीक गेल्याने शेतकरी दु:खी झाला आहे. झाडे मुळासकट पडल्याने पुन्हा शेतकºयाला पीक घेता येणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण होऊनसुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळत नाही. शेतकºयांना तातडीची मदत करणे आवश्यक असताना, विलंब होत असल्याबाबत अंकिता दळवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुरुड तहसील कार्यालयात बागायत व फळबागांसाठी तीन कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले. ४२५ लाभार्थ्यांना आतापर्यंत ३६ लाख तीन हजार ५०० रुपये वाटप केले आहेत. बागायत जमिनीसाठी शासन निर्णय हेक्टरी ५० हजार या नियमाप्रमाणे पैशाचे वाटप करीत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

८,६२५ शेतकºयांचे पंचनामे
मुरुड तालुक्यातील एक हजार हेक्टर क्षेत्रापैकी ८,६२५ शेतकºयांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या सर्वांना नुकसान भरपाई देणार असून लवकरच नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यांत पैसे जमा होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.अहिरे यांनी
दिली आहे.

Web Title: Compensation should be received immediately in Nandgaon area; Huge damage to coconut, betel orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.