पंचनामे करून तत्काळ भरपाई देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:10 AM2020-06-10T00:10:38+5:302020-06-10T00:10:51+5:30

प्राजक्त तनपुरे यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

Compensation will be given immediately by Panchnama | पंचनामे करून तत्काळ भरपाई देणार

पंचनामे करून तत्काळ भरपाई देणार

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि कोरोना संदर्भातील उपाययोजनांसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात सर्वात जास्त नुकसान विजेच्या खांबांचे झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत, तेथे नवीन खांब बसवून ती कामे तातडीने पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करावा. तसेच दोन ते तीन दिवसांत पूर्ण एसटी लाइनचे काम पूर्ण करावे. या कामासाठी बाहेरून जेवढे उपलब्ध होईल तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्थानिक मजूर लावायचे असतील तसेच काही साधनसामग्री खरेदी करावयाची असेल त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली
जाणार नाही, असेही तनपुरे यांनी सांगितले.
या वेळी आमदार महेंद्र दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्केपाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आर.एस. मोरे, कार्यकारी अभियंता, महावितरण अलिबाग माणिकलाल तपासे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर आदी उपस्थित होते.

नागरिकांनी एकजुटीने परिस्थितीचा सामना केला पाहिजे : महावितरणच्या अधिकाऱ्यांनादेखील त्यांच्या अधिकारात या कामासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार दिलेले आहेत. जेणेकरून काम करताना कुठली कमतरता पडू नये; परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची ही वेळ असल्याचे स्पष्ट केले. कोरोनामुळे बाहेरचे मजूर यायला घाबरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ, नागरिकांनी एकजुटीने या सर्व परिस्थितीचा सामना केला पाहिजे. ज्या व्यक्तींच्या घरांची पडझड झाली आहे, झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे; या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्यांना भरपाई देण्यात येईल.

Web Title: Compensation will be given immediately by Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.