आचारसंहिता भंगाची खालापुरात तक्रार
By admin | Published: February 22, 2017 06:42 AM2017-02-22T06:42:02+5:302017-02-22T06:42:02+5:30
पंचायत समिती फंडातून केलेली विकासकामाची माहिती देणारी पाटी आचारसंहिता काळात
वावोशी : पंचायत समिती फंडातून केलेली विकासकामाची माहिती देणारी पाटी आचारसंहिता काळात झाकून ठेवण्यास हयगय करणाऱ्या चौक ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात चौक येथील ग्रामस्थ राजेंद्र केरू गावडे यांनी खालापूर निवडणूक अधिकारी आणि आचारसंहिता निरीक्षक वरिष्ठ गटविकास अधिकारी भूषण जोशी यांच्याकडे तक्रार केलीआहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत असून निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून आचारसंहिता सुरू झाली आहे. राजकीय बॅनर, विकासकामाचे माहिती फलक, उद्घाटनाच्या पाट्या या आचारसंहितेच्या काळात झाकून ठेवणे बंधनकारक असताना चौक ग्रामपंचायत हद्दीत मात्र पंचायत समितीच्या फंडातून केलेल्या विकासकामांची माहिती देणारी पाटी व उद्घाटन पाटी जाणीवपूर्वक झाकली नसल्याचा आरोप तक्रारदार राजेंद्र गावडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची माजी जिल्हापरिषद सदस्य असलेल्या पत्नीचे नाव पाटीवर असल्यामुळे उमेदवाराला फायदा होणार आहे, असे तक्र ारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्र ारदार गावडे यांनी या पाटीचे फोटो काढून लेखी तक्रार निवडणूक अधिकारी व गटविकास अधिकारी यांना दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)
अधिकाऱ्याला नोटीस
च्याप्रकरणी चौक ग्रामविकास अधिकारी सूळ यांना नोटीस दिली असून संबंधित पाटी झाकण्यासाठी कर्मचारी रवाना केले असल्याची माहिती आचारसंहिता निरीक्षक वरिष्ठ गटविकास अधिकारी भूषण जोशी यांनी दिली.