महाड : महाड शहरातल्या समाधान सामाजिक संस्थेकडून प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी रायगड किल्ला स्वच्छता अभियान आयोजित केले होते. रायगड किल्ला स्वच्छता अभियान सुरू करणाऱ्या या संस्थेचे हे आठवे वर्ष आहे. संस्थेचे तरुण कार्यकर्ते किल्ल्यावर जावून पर्यावरण संवर्धन जनजागृती आणि स्वच्छता करण्याचे काम करत आहेत.गडांचे जतन व्हावे, गड परिसरातील वनसंपदा कायम राहावी, पर्यावरण संवर्धन व्हावे या दृष्टीने समाधान सामाजिक संस्थेच्या वतीने सात वर्षांपूर्वी रायगड स्वच्छता मोहीम सुरू केली होती. यावेळी पहिल्या वेळेस कचरा एकत्रित करून रायगडाखाली आणला गेला. त्याचप्रमाणे प्लास्टीक बाटल्या देखील खाली आणल्या. यानंतर संस्थेने हा उपक्रम प्रतिवर्षी सुरुच ठेवला. विविध संस्था आणि शासकीय पातळीवर देखील स्वच्छता अभियान रायगडावर राबवण्यात आले. रायगडावर येणाऱ्या शैक्षणिक सहलीतील मुलांना देखील समाधान संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करण्याचे काम केले. गडावर कचरा कुंड्या देखील ठेवण्याचे काम संस्थेने केले होते.संस्थेच्या वतीने नुकतीच किल्ले रायगडावर यावर्षी स्वच्छता अभियान राबवले. यामध्ये होळीचा माळ, बाजारपेठ, राजसदर, जगदीश्वर मंदिर, आदी परिसरात जावून कचरा उचलण्याचे काम करण्यात आले. रायगडावरील या अभियानात संस्थेचे भारत वडके, जयंत कदम, सुयोग निकम, मंगेश सुकूम, जनार्दन पुलेकर, राजेश सुकूम, सचिन सुतार, अमृत पाटील, मनोज वगरे, राजेंद्र पांचाळ, नितीन दोषी, गौरव भातखंडे आदींनी सहभाग घेतला होता. (वार्ताहर)आठ वर्षांपासून स्वच्छता मोहीम सुरूच...च्संस्थेने गेली आठ वर्षे हे अभियान प्रतिवर्षी राबवले आहे. गडावर आता स्वच्छता दिसू लागली असून परिसरात दिसणाऱ्या प्लास्टीक बाटल्या देखील तुरळक दिसत असल्याने संस्थेच्या जनजागृतीला यश येत असल्याचे मत यावेळी संस्थेचे जयंत कदम यांनी स्पष्ट केले. च्संस्थेचे हे आठवे वर्ष असून यावर्षी येत्या २६ फेब्रुवारी रोजी संस्थेकडून महाड शहरात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात देखील रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भारत वडके यांनी के ले.
रायगड किल्ला स्वच्छता मोहीम पूर्ण
By admin | Published: February 20, 2017 6:13 AM