सारळ-घोळ धरण पूर्ण करा, अनंत पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:37 AM2018-03-10T06:37:24+5:302018-03-10T06:37:24+5:30

रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागात प्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्यास

 Complete the Saral-Ghol Dam, Order of Anant Patil | सारळ-घोळ धरण पूर्ण करा, अनंत पाटील यांची मागणी

सारळ-घोळ धरण पूर्ण करा, अनंत पाटील यांची मागणी

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागात
प्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्यास, तब्बल ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जिल्हा प्रशासनासह सरकारचे
या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी
सारळचे माजी सरपंच अनंत
पाटील यांनी एक दिवसाचे
लाक्षणिक उपोषण केले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांना
दिले.
अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईपासून जवळ असणाºया अलिबाग तालुक्याचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नाही. रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न आजही तालुक्याच्या कानाकोपºयात उभे आहेत. जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. केंद्र सरकारसह राज्य सराकारमार्फतही विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च केला जातो; परंतु तेथील प्रश्न अजूनही कमी होताना दिसत नाहीत. किंबहुना अधिक प्रश्न हे जैसे थे असेच आहेत. त्यामध्ये पाणीप्रश्नाचा प्रामुख्याने समावेश आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील नळ पाणीपुरवठा योजना अशा विविध योजना आखल्या आहेत. त्यासाठीही सरकारने कोट्यवधी रुपये देऊ केलेले आहेत; परंतु पाणीप्रश्न अद्यापही सुटलेला नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाणीप्रश्न आ वासून उभा राहतो. यावर तोडगा काढण्यासाठी सारळ-घोळ धरणाची संकल्पना सुमारे ३० वर्षांपूर्वी पुढे आली होती. मात्र, या धरणाला म्हणावे तसे मूर्त रूप देण्यास स्थानिक आमदार, खासदार आणि जिल्हा प्रशासनाला यश आलेले नाही.
तालुक्यातील खारेपाट विभागामध्ये पाण्याचा प्रश्न आता हळूहळू पेटू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्तावित सारळ-घोळ धरणाची आठवण झाली आहे. हे धरण अस्तित्वात आल्यास सारळ, म्हात्रोळी, दत्तपाडा, फुफादेवीचा पाडा, सारळ आदिवासीवाडी, म्हात्रोळी आदिवासीवाडी, डावली रांजणखार, बागदांडे, रेवस, बेलपाडा, कावाडे, बोडणी, मिळकतखार, विर्तसारळ, कोप्रोली, मांडवा, धोकवडे यासह अन्य मिळून सुमारे ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.
या धरणासाठी जास्तीत जास्त सरकारी जमिनीचाच वापर होणार असल्याने विरोधाचे कारणच राहत नाही.
तसेच ग्रामस्थांना पिण्यासह शेतीसाठीही मुबलक पाणी मिळणार असल्याने या धरणाला कोणाचाच विरोध राहिलेला नाही आणि राहणारही नाही, असे उपोषणकर्ते अनंत पाटील यांनी सांगितले. धरणाच्या या प्रश्नाकडे प्रशासनासह सरकारचे लक्ष वेधता यावे, यासाठी एक दिवसीय उपोषण केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

धरणासाठी निर्सगनिर्मित भौगोलिक रचना
च्सारळ-घोळ धरण बांधण्यासाठी दोन्ही बाजूंना मोठमोठे डोंगर आहेत. त्या दोन्ही डोंगरांच्या मध्ये भली मोठी भिंत म्हणजेच धरण उभारल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा धरणात होऊ शकतो. कारण अलिबाग तालुक्यामध्येही मोठ्या संख्येने पाऊस पडतो.
च्मात्र, कोणतीही उपाययोजना नसल्याने ते पावसाचे पाणी डोंगर-दºयातून समुद्राला जाऊन मिळते. तेच पाणी अडवल्यास सुमारे ३५ गावांची तहान भागवता येणार आहे. त्यामुळे प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

Web Title:  Complete the Saral-Ghol Dam, Order of Anant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड