टोळ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:43 AM2019-01-26T00:43:13+5:302019-01-26T00:43:16+5:30

महाड तालुक्यातील दादली आणि टोळ या दोन पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.

Complete the structural audit of the bridge bridge | टोळ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

टोळ पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

Next

महाड : महाड तालुक्यातील दादली आणि टोळ या दोन पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. या ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे.
टोळ पुलाचे ऑडिट पूर्ण झाले आहे. या पुलाच्या चार पिलर्सपैकी तीन पिलर्सना उभे आणि आडवे तडे गेले असल्याचे आढळून आले आहे. दोन्ही पुलांसंदर्भातील अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो अधीक्षक अभियंता, संकल्प चित्र मंडळ, कोकण विभाग यांच्याकडे पाठविण्यात येईल. या विभागाने दुरु स्तीबाबतच्या उपाययोजना सुचविल्यानंतर दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात येईल, अशी
माहिती महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर यांनी दिली.
दरम्यान, याच विभागांतर्गत येणाऱ्या आंबेत येथील पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण झाले असून दुरु स्तीच्या ११ कोटी ६५ लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रि या लवकरच पूर्ण करून कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचेही बहिर यांनी स्पष्ट केले.
>डिसेंबर महिन्यात महाड तालुक्यातील तुडील-भेलोशी रस्ता (दीड कोटी रु पये) आणि पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर-कुडपण रस्ता (दोन कोटी रुपये) या कामांना मंजुरी मिळाली आहे.महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यात २५/१२ या शीर्षकांतर्गत करावयाच्या पाच कोटी रु पयांच्या कामांना देखील मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे.

Web Title: Complete the structural audit of the bridge bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.