गॅसवाहिनीचे काम पूर्ण

By admin | Published: October 25, 2015 12:24 AM2015-10-25T00:24:55+5:302015-10-25T00:24:55+5:30

सिडको वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ठिकठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे.

Completed gas work | गॅसवाहिनीचे काम पूर्ण

गॅसवाहिनीचे काम पूर्ण

Next

- अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोली
सिडको वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ठिकठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. इतर ठिकाणी खोदकाम करून वाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी खाडीप्रवण क्षेत्रात कांदळवनामुळे अनेक अडचणी येत होत्या. कांदळवने वाचविण्यासाठी कोपरा खाडीच्या खालून पाइपलाइन ‘ट्रेज लेस’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, हे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे कांदळवनांची हानी टळली आहे. त्यामुळे लवकरच सिडको वसाहतीतील रहिवाशांना पाइपद्वारे गॅसपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पनवेलची लोकसंख्या साडेआठ लाखांवर पोचली आहे. या ठिकाणी होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महानगराच्या दृष्टीने शहराची वाटचाल सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात विविध पायाभूत सुविधांचे जाळे पसरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पैकी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईत याच प्रकारे पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवला जातो. त्याच धर्तीवर सिडको वसाहती आणि पनवेल शहराला गॅसपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस निगम लिमिटेडद्वारे पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सुरुवातीला खारघर वसाहतीपर्यंत गॅसच्या वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शेडुंगपर्यंत विस्तारण्यात आल्या. मात्र खारघर आणि कळंबोली यादरम्यान असलेल्या कोपरा खाडी व आजूबाजूला कांदळवन असल्याने त्या पट्ट्यातील काम थांबले होते. मात्र या ठिकाणी पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एलीटी मशिनद्वारे ट्रेज लेस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याकरिता जिप्सम स्ट्रक्चर या कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. तळोजा लिंक रोडलगत पॉइंट तयार करून या ठिकाणाहून ड्रिलिंगद्वारे काम करण्यात आले. ही वाहिनी जमिनीखाली टाकण्यात आली आहे. ती फुटण्याचा अथवा गॅस गळतीचा धोका नाही.
कुठेही तांत्रिक बिघाड झाला तरी त्याचा परिणाम या पट्ट्यात होणार नाही, तशी यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर कांदळवनाचा ऱ्हास न होता पाइपलाइन टाकण्यात आली आहे. खोली जास्त असल्याने झाडांच्या मुळाला कोणतीही इजा पोहोचणार नसल्याचे पर्यावरणतज्ज्ञ तारिक बिलाल म्हणाले.

Web Title: Completed gas work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.