रायगडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 02:36 AM2020-01-25T02:36:40+5:302020-01-25T02:37:07+5:30
देशात लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयक, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, वाढती महागाई याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
अलिबाग - देशात लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयक, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, वाढती महागाई याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. रायगड जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
बहुजन विकास आघाडीसह राज्यातील तब्बल ३५ संघटनांनी महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला. प्रवासी वाहतूक, दुकाने विविध आस्थापना यांचे दैनंदिन व्यवहार काही ठिकाणी सुरळीत सुरू होते. अलिबागमध्येही बंद पाळण्यात आला. भारिपच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून तालुक्यातील दुकाने बंद करण्याबाबत आवाहन केले. अलिबागमधील अर्धी बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. माणगाव बाजारपेठ, रोहा, कर्जत, रसायनी, मोहपाडा, पेण आणि खोपोली या ठिकाणीही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बिरवाडीत संमिश्र प्रतिसाद; आर्थिक नुकसानीमुळे व्यापारी नाराज
बिरवाडी : केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे राष्ट्रीय नागरिक नोंदणी अंतर्गत एनआरसी लागू केल्याच्या विरोधात वंचित विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत झेंडे दाखवत बिरवाडी बाजारपेठमधील दुकाने बंद के ली.भारतीय रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानंतर वंचित विकास आघाडीचे कार्यकर्ते संदीप केशव सोनवणे, नवनाथ लोकरे, आदेश सखाराम सकपाळ, सागर गंगाराम भोसले, श्रवण सकपाळ, निखिल तांबे आदीनी एनआरसी कायद्याच्या विरोधात महाड तालुक्यातील बिरवाडी बाजारपेठेत रस्त्यावर उत्तर निदर्शने करीत बाजारपेठेमधील दुकाने बंद केली. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रभर वंचित विकास आघाडीतर्फे पाळण्यात येणाऱ्या बंदबाबतचे निवेदन संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याची माहिती वंचित विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
बिरवाडीमधील बंदचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाल्याने कामानिमित्त जाणारे कामगार, विद्यार्थी यांची काही प्रमाणात गैरसोय झाली. एनआरसी व नागरिकत्व दुरुस्त कायदा सीएएला विरोध म्हणून पुकारण्यात आलेल्या बंदला बिरवाडी परिसरात संमिश्र प्रतिसाद लाभला. निर्माण होणाºया प्रत्येक समस्येकरिता कायम बंदची हाक दिली जात असल्याने व्यापाऱ्यांना मात्र आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे व्यापारीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोहोपाड्यात अल्प प्रतिसाद
रसायनी : महाराष्ट्र बंदला खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे अल्पसा प्रतिसाद लाभला. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. शुक्रवारी मोहोपाडा बाजारपेठेला साप्ताहिक सुट्टी असते, त्यामुळे बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. किराणा दुकाने, टपºया, मच्छी मार्के ट, रस्त्याकडेला बसणारे स्थानिक भाजीविक्रे ते, हातगाडावाले यांनी बंद पाळला. शाळा, कॉलेज चालू असल्याने स्कूलबसेस चालू होत्या. सहाआसनी रिक्षांना नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होती. तीनआसनी रिक्षांची संख्या कमी होती. एसटी बसेस धावत होत्या. बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे रसायनी पोलिसांनी सांगितले.
कर्जतमध्ये कडकडीत बंद
कर्जत : सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध तसेच एनपीआर, एनआरसी, सीएए कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. शुक्रवार, २४ जानेवारी रोजी कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य दीपक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, प्रसिद्धी प्रमुख अनिल गवळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष अनंता गायकवाड, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, युवानेते धर्मेंद्र मोरे, युवाध्यक्ष प्रदीप ढोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.