शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गणेशोत्सवातील निर्माल्यापासून बनवणार कंपोस्ट खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 4:28 AM

सिडकोने केली विसर्जन घाटावर व्यवस्था; तयार खत उद्यान, तसेच परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी वापरणार

कळंबोली : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवातील निर्माल्य स्वतंत्र जमा करण्याची व्यवस्था कळंबोली आणि कामोठे येथील विसर्जन तलावावर करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन टन निर्माल्य जमा केले असल्याची माहिती सिडकोच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यापासून कंपोस्ट खतनिर्मिती करण्यात येणार आहे. यातून तयार झालेल्या खताचा वापर उद्यान त्याचबरोबर झाडांकरिता करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कळंबोली, कामोठे वसाहतीत दरवर्षी साडेसात हजार घरगुती व सार्वजनिक गणपती बसविले जातात, त्यामध्ये कामोठे येथे ४१५७ व कळंबोलीत ३३८० इतक्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या परिसरात दीड दिवसांच्या घरगुती गणपतीची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्याशिवाय गौरी-गणपतीचा आकडाही मोठा आहे. मूर्तींबरोबर निर्माल्यही जलाशयात विसर्जित करण्यात येत असे. त्यामुळे पाणी दूषित होऊन जलचरांवर परिणाम होत होता. या कारणाने निर्माल्य पाण्यात टाकू नये, असे आवाहन विविध पर्यावरण, त्याचबरोबर सामाजिक संस्थाकडून करण्यात येऊ लागले.दोन वर्षांपूर्वी पनवेल शहरात कृत्रिम तलाव करून यावर चांगला तोडगा काढला होता. तरी सिडकोमध्ये मात्र अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही; परंतु गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रशासनाने निर्माल्याकरिता खास व्यवस्था केली आहे. एकूण पाच निर्माल्य कलश आणि सात व्हॅन, ११ लिटरच्या सहा आणि इतर मोठ्या दहा, अशा एकूण १६ डसबिन विसर्जन तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. अनिरुद्ध अकादमीचे स्वयंसेवकही या कामी सहकार्य करीत आहेत. सिडकोने गेल्या पाच दिवसांत सुमारे तीन टन निर्माल्य संकलन केले आहे. विसर्जन तलावात निर्माल्य टाकण्यास मनाई करण्यात आली आहे.तीन महिन्यांत खत तयार होणार११ दिवसांचे गणपती विसर्जनानंतर त्याचे कंपोस्टिंग केले जाणार आहे. सिडकोने कामोठे येथील सेक्टर ५ येथील मोकळ्या भूखंडावर ही व्यवस्था केली आहे. येथे खड्डा तयार करून, त्यात निर्माल्य आणि पुन्हा माती टाकून तीन थर तयार करण्यात येणार आहेत. तीन महिन्यांत कंपोस्ट खताची निर्मिती होईल.निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीकर्जत : कर्जत नगरपालिकेने स्वच्छतेबरोबर प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजन सुरू केल्या आहेत. उत्सवकाळात उल्हास नदीमध्ये निर्माल्य टाकू नये, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. या निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे.कचरा संकलन आणि विघटनामध्ये कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कर्जतचे नाव देशात आघाडीवर नेल्यानंतर आता उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.कर्जत शहरात ज्या चार ठिकाणी गणेशघाट आहेत, तेथे निर्माल्य कलश ठेवून पालिका थांबली नाही, तर त्यांनी आपले स्वच्छतादूत दहिवली, महावीर पेठ, आमराई, मुद्रे येथील गणेशघाटावर उभे करून भक्तांकडील निर्माल्य गोळा केले जात आहे.समुद्रकिनाऱ्यांवर निर्माल्य कलशरेवदंडा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत परिसरातील समुद्रकिनाºयावर निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. हा उपक्रम पर्यावरण संवर्धन व जल स्वच्छता अभियान या मुख्य हेतूने राबवला जात आहे.गणेश विसर्जन सोहळ्यानंतर किनाºयावर प्रदूषण निर्माण होते, तसेच किनारे विद्रूप रूप प्राप्त करतात, हे टाळण्यासाठी निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तमंडळींचा त्याला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिष्ठानतर्फे वृक्षलागवड केल्यावर श्री सदस्यांनी निर्माल्य जमा करून खतनिर्मिती करण्याचा उपक्र म राबवला आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRaigadरायगड