रायगड जिल्ह्यातील ५८ गावांत ‘एक गाव एक गणपती’, सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावेत यासाठी संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 04:19 AM2017-08-25T04:19:46+5:302017-08-25T04:20:01+5:30

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची उत्सकता दिवसागणिक वाढताना दिसते, त्याचप्रमाणे समाजामध्ये एकोपा आणि सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता जिल्ह्यामध्ये जोर धरताना दिसून येते.

 Concepts in 58 villages of Raigad district, 'Ek Gaav Ek Ganapati', enhancement of reconciliation | रायगड जिल्ह्यातील ५८ गावांत ‘एक गाव एक गणपती’, सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावेत यासाठी संकल्पना

रायगड जिल्ह्यातील ५८ गावांत ‘एक गाव एक गणपती’, सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावेत यासाठी संकल्पना

Next

- आविष्कार देसाई ।

अलिबाग : इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची उत्सकता दिवसागणिक वाढताना दिसते, त्याचप्रमाणे समाजामध्ये एकोपा आणि सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता जिल्ह्यामध्ये जोर धरताना दिसून येते. यावर्षी जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये, ‘एक गाव एक गणपती’ उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.
एखादी नवीन स्टाइल अथवा नवा ट्रेंड हा शहराकडून ग्रामीण भागाकडे जातो. ग्रामीण भागातील नागरिक विशेष करून तरु णाई तो ट्रेंड तातडीने आत्मसात करतात; परंतु अशा काही तुरळकच प्रथा, गोष्टी आहेत. त्या ग्रामीण भागाकडून शहराकडे जातात. समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे.
शहरी आणि ग्रामीण विभागातील भक्तांना दहा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जायचे. मात्र, बदलत्या काळात गणेशोत्सवाचा ‘इव्हेंट’ झाल्यापासून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण आले आहे. विविध मंडळे ही स्थानिक राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेली असल्याने त्यामध्ये भक्तीचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जाते. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो. त्यातच सार्वजनिक गणपतींची वाढती संख्या ही पोलिसांच्या कामात भर पाडणारीच आहे. काही मंडळे आपलाच गणपती कसा मोठा आहे? आमच्याच मंडळांची मिरवणूक किती मोठी आहे. हे दाखविण्यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. वादावादी, हाणामाºया या सर्वांमुळेच धार्मिक गणेशोत्सवाला गालबोट लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
मुंबईसह पुण्यासारख्या शहरातच नव्हे, तर गावागावांतील गणेशोत्सव शांततेत पार पाडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरू लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सार्वजनिक गणेशोत्सवात होणारी पैशांची उधळपट्टी थांबावी, गावातील वाद मिटावेत आणि लोकवर्गणीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन स्ािमतीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘एक गाव एक गणपती’चा पुरस्कार करीत, हा उपक्र म गावागावांत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ अभियानात, ‘एक गाव एक गणपती’च्या उपक्र माचा समावेश करून या चळवळीला राजकीय बळ देण्याचे काम केले.

- २०१२मध्ये महाराष्ट्र राज्यात १० हजार गावांत, ‘एक गाव एक गणपती’ बसवले होते. गेल्या वर्षी हाच आकडा १३ हजारांच्या पुढे गेला होता. यंदाही हा आकडा १७ ते १८ हजारांच्या घरात जाण्याची पोलिसांना अपेक्षा आहे.
- राज्यातील खेड्यांची संख्या विचारात घेतली तर ही संख्या फारच कमी आहे. ज्या ज्या गावांत हा उपक्र म सुरू झाला आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक फायदा त्या गावाला मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. म्हणून ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्र म केवळ योजनेपुरताच मर्यादित न ठेवता, गृह विभागाने तो ‘जलयुक्त शिवार’ या अभियानाप्रमाणे गावागावांत पोहोचवायला हवा.
- शहरी भागातही ‘एक प्रभाग एक गणपती’चा उपक्र म प्रभावीपणे राबविल्यास त्याचा चांगला फायदा होईल. मात्र, त्यासाठी सामाजिक मानसिकतेबरोबरच राजकीय भान बदलण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.

Web Title:  Concepts in 58 villages of Raigad district, 'Ek Gaav Ek Ganapati', enhancement of reconciliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.