संजय गायकवाड कर्जत : तालुक्यातील नेरळ गावात सिमेंट काँक्रीटच्या आरसीसी रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नियमानुसार आरसीसी काँक्रीट दाबण्यासाठी व्हायब्रेटर वापरले जाणे आवश्यक आहे. तसेच लोखंडी प्लेट लावून, ते रस्ते नटबोल्टने जुळवून कामे करणे आवश्यक असताना, या तांत्रिक बाबींचा उपयोग केला जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.नेरळ गाव हे एमएमआरडीएअंतर्गत असलेले महत्त्वाचे गाव असून, मुंबईचे उपनगर म्हणून या गावाकडे पाहिले जाते. माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटन केंद्राकडे जाण्यासाठी प्रवेशद्वार समजले जाणाºया या गावातील रस्ते मुंबईच्या धर्तीवर असावेत, यासाठी आरसीसी रस्ते बनविताना काळजी घेतली जात आहे. २३ कोटींचा निधी वर्ग करताना प्राधिकरणाने नेरळ गावातील रस्ते करताना रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कामाचा दर्जा कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र, आता केवळ दुसºया भागात रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या कामाचा दर्जा ठेवण्यात जिल्हा परिषद कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. प्राधिकरणाच्या निधीमधून नेरळ गावातील रस्ते आरसीसी काँक्रीटचे करताना घालून दिलेले निर्देशांची ठेकेदाराकडून अंमलबजावणी केलेली दिसून येत नाही. कारण माथेरान रस्त्यावर रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना आणि आता मुरबाड रस्त्यावर आरसीसी काँक्रिटचा रस्ता बनविताना प्रामुख्याने दोन तांत्रिक बाबींचा वापर करण्याचे टाळले आहे. त्यामुळे रस्त्याचे आयुष्यमान कमी होण्याची शक्यता असून, अल्पावधीत रस्त्याला भेगा पडण्यास सुरुवात होते आणि रस्ता फुटू शकतो. याचा त्रास भविष्यात स्थानिक आणि पर्यटकांना होणार आहे.>रस्ता मजबूत करण्यासाठी लागणाºया साहित्याचा उपयोग नाहीप्राधिकरणने रस्त्याचे आरसीसी काँक्रिटचे काम मजबूत व्हावे, यासाठी सिमेंट ओतल्यानंतर लोखंडी सळई यांच्यात तसेच जमिनीत सिमेंट पोहोचावे, यासाठी व्हायब्रेटरचा एकदाही वापर केला गेला नाही. यामुळे रेडीमिक्स सिमेंट हे शेवटच्या थरापर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्याच वेळी रस्त्यावर कोणताही काँक्रिटचा भाग एका रेषेत राहावा, असा प्रयत्न असतो. रस्त्याचा भाग कुठेही बाजूला जाऊ नये, यासाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना दोन्ही बाजूला लोखंडी प्लेट लावून आणि त्याला नटबोल्ड लावून मजबूत करण्यात येते. जेणेकरून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना ते अखंड आणि एकसंघ व्हावे, अशी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची अपेक्षा आहे. आतापर्यंत एकदाही या दोन्ही प्रणालींचा वापर जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून झालेला नाही.रस्त्याचे काम करताना ब्रेकर आणि लोखंडी प्लेट नटबोल्ट लावून मजबूतपणे बांधून ठेवल्या नसल्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. सध्या गावातून केवळ हलकी वाहने ये-जा करीत आहेत. पूर्ण रस्ता वाहतुकीस खुला झाल्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्यानंतर त्या भेगा पडलेल्या रस्त्याची काय अवस्था होईल, याचा विचार करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आपले भरारी पथक पाठवून पाहून घ्यावे.- सनी चंचे, सदस्य नेरळ ग्रामपंचायतआम्ही ठेकेदार कंपनीला रस्त्याचे काम नियमानुसार करण्याची सूचना केली आहे. ब्रेकर आणि लोखंडी प्लेट नटबोल्ट यांचा वापर मजबूत रस्ते होण्यासाठी होत नसेल, तर त्याची दखल जिल्हा परिषद घेईल.- एस. ए. केदा, उपअभियंता, रायगड जिल्हा परिषद
रस्त्याच्या कामात फसवणूक, व्हायब्रेटर न वापरता नेरळमध्ये काँक्रिटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 3:16 AM