शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

अलिबागमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयाची अवस्था जैसे थे; डॉक्टरांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:54 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘माझे आरोग्य माझे हक्क’ अभियानाचा फज्जा

अलिबाग : जिल्हा सरकारी रुग्णालयातील असुविधेबाबत मध्यंतरी महिला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘माझे आरोग्य माझे हक्क’ या अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य व्यवस्थेची चिरफाड केली होती. त्यानंतर आरोग्य व्यवस्थेमध्ये काही सुधारणा होतील अशी भाबडी आशा होती, मात्र आजही जिल्हा सरकारी रुग्णालयात दखल घेण्याइतपतही परिस्थिती सुधारलेली दिसून येत नाही. त्यामुळे ‘माझे आरोग्य माझे हक्क’ हे अभियान राबवून नेमके काय साध्य झाले असा सवाल उपस्थित होत आहे.अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. याच ठिकाणी जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख कार्यालये आहेत. पोलादपूरपासून ते खालापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी येथे येत असतात. सरकारी रुग्णालय असल्याने येथे उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचीच संख्या अधिक आहे. दोनच वर्षापूर्वी तब्बल १० कोटी रुपये खर्चून जिल्हा सरकारी रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र रुग्णालयामध्ये सातत्याने डॉक्टरांची कमतरता असते.बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टर रुग्णांना तपासून झाल्यावर त्यांना बाहेरील औषधे घेण्याचा सल्ला देता. कारण सदरची औषधेही रुग्णालयाच्या औषध विभागात उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करतात. बाहेरील औषधे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात. त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण निर्माण होते. त्याचप्रमाणे एखाद्या रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी औषधे विविध साहित्यही बाहेरुन आणण्यास सांगितले जाते. याबाबत रुग्ण तसेच नातेवाइकांकडून अनेकदा तक्रारीही झाल्या आहेत.रायगड जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच राज्यातील अन्य जिल्हा सरकारी रुग्णालयांची स्थिती आहे. रुग्णालयांची स्थिती जाणून घेण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या आधी ‘माझे आरोग्य माझे हक्क’हे अभियान राबवले होते. त्यामध्ये रायगडच्या जिल्हाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती उमा मुंढे यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली होती.रुग्णालयातील शौचालयातील अस्वच्छता, डॉक्टरांची कमतरता, पत्राच्या शेडखाली ठेवलेली नवजात बालके, प्रसूती कक्षातील अस्वच्छता, अतिदक्षता विभागातील नादुरु स्त यंत्रसामग्री असे विदारक चित्र त्यांना दिसले होेते. जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीतील अहवाल जिल्हाध्यक्ष दीपिका चिपळूणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजीया खान यांच्याकडे सुपूर्द केला होता. अहवालाबाबत वरिष्ठ स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. सद्यस्थितीत प्रसूती कक्षात अस्वच्छता आहे. स्वच्छतागृहातील कचरा डस्टबीनच्या बाहेर टाकण्यात येत असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पंख्यांची असुविधा, कर्मचारी गैरहजर, गरम पाणी नाही, बंद पडलेली यंत्रसामग्री त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत.सर्वसामान्यांना न्यायाची मागणीलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन उभारले मात्र त्यातून नेमके काय निष्पन्न झाले असा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने उपलब्ध अहवालाबाबत योग्य तो निर्णय घेऊन जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेणाºया सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे हे अभियान म्हणजे निवडणुकीआधी मतदारांना दाखवण्यात आलेले प्रलोभनच ठरणार असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल