अलिबाग : एलईडी मार्फत मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रामध्ये दिसल्यास पारंपारीक मच्छीमारांबरोबर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे नौदल, तट रक्षक दल आणि मत्स्य विभागाने यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, अशी प्रमुख मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली. अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे रविवारी झालेल्या रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांच्या सभेत ते बोलत होते.अवकाळी पाऊस, ‘क्यार’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मासेमारी करणाºया बोट मालकांना प्रत्येकी १ लाख रुपये तर खलाशांना प्रत्येकी २५ हजार सानुग्रह अनुदान द्यावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली एलईडी मासेमारी तातडीने बंद करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेल भरो आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले. सरकारने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन लवकरच लगाम कसावी, समुद्रातील मच्छीचे साठे संपत आहेत. त्यामुळे भविष्यात कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे.कोळी बांधव शेतकºयांप्रमाणे आत्महत्या करणार नाही मात्र ‘क्यार ’ आणि ‘महा’ चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे फार मोठे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने प्रत्येक बोटमालकाला डिझेलसाठी १ लाख रु पये सानुग्रह अनुदान द्यावे आणि खलाशांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी केली. सर्व पक्षीय लोकप्रतिनीधींनीना निवेदन देवून पाठपुरावा सुरू आहे. तसेच प्रधान सचिव अनुपकुमार यांनाही तातडीने निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.आमचे प्रश्न सरकारने न सोडविल्यास जेल भरो आंदोलन तसेच रायगड जिल्ह्यातील मच्छीमार संस्था या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी कोळी बांधवांना संजय कोळी (जनरल सेक्र ेटरी रायगड), बनार्ड डिमेलो (कार्याध्यक्ष, भाईंदर), विश्वनाथ नाखवा (जिल्हाध्यक्ष, रायगड) धर्मा घारबट, रेवस-बोडणीचे चेअरमन विश्वास नाखवा आदींनी मार्गदर्शन केले.होणारे संघर्ष टाळण्याचा प्रयत्नबोडणी येथे झालेल्या मच्छीमार बांधवांच्या सभेत एलईडी फिशींग संदर्भात जो महत्वपूर्ण ठराव झाला आहे. त्याकडे सरकार, नौदल, तट रक्षक दल, मत्स्य विभाग यांनी खरोखरच गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. भर समुद्रामध्ये काहीच दिवसांपूर्वी एलईडी फिशींग वरुन आक्षी आणि रेवस-बोडणी येथील पारंरपारीक मच्छीमार यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष उफाळून आला होता. त्यावेळी हे प्रकरण नेमके कोणाच्या अधिकारात येते आणि याप्रकरणी कोणी कारवाई करायची अशा संभ्रमात तट रक्षक दल, पोलीस आणि मत्स्य विभागाला पडले होते.त्यामुळे १४५ किमी आत घडलेल्या सिनेस्टाईल थरार रोखण्यात कोणत्याच यंत्रणेला यश आले नव्हते. यामध्ये बोडणी येथील सहा जण जखमी झाले होते, तर भरत कोळी यांना जास्त मारहाण झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. संबंधीत यंत्रणांनी वेळीच एलईडी फिशींगवर कारवाई केली नाही तर, पारंपारीक मच्छीमार आणि एलईÞडी मासेमारी करणारे यांच्यामध्ये संर्घष होतच राहतील आणि याची मोठी किंमत सरकारला चुकती करावी लागण्याची शक्यता बोडणी येथील बैठकीतून दिसून येते.
एलईडी आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष अटळ, दामोदर तांडेल यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:26 AM