- आविष्कार देसाईअलिबाग : मासेमारी करणाऱ्या दोन गटांमध्ये मुरुड-कोर्लईच्या भरसमुद्रामध्ये संघर्ष उफाळून आला. अलिबाग तालुक्यातील आक्षीमधील एक गट एलईडी फिशिंग करत असल्याने त्यांना रेवस-बोडणीमधील मासेमारी करणाऱ्यांनी हटकले असता, दोन्ही गटांमध्ये वाद होऊन याचे रुपांतर हाणामारीमध्ये झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील बोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. बोडणीमधील मासेमारी करणाºयांनी आक्षीमधील बोटींवर ताबा मिळवला. त्यानंतर ते मांडव्याच्या दिशेने त्यांना घेऊन निघाले आहेत. त्यांना पोहोचण्यासाठी तब्बल सहा तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.एलईडी फिशिंग करणे कायद्याने गुन्हा असतानाही आक्षी येथील चार मासेमारी बोटी एलईडीच्या माध्यमातून मुरुड-कोर्लई परिसरात मासेमारी करत होत्या. सदरची बाब रेवस-बोडणी येथील मासेमारी करणाºयांना आढळली. त्यामुळे त्यांनी आक्षीवाल्या बोटीतील मासेमारी करणाºयांना हटकले. त्याचा राग आल्याने एका गटाने दुसºया गटावर दगडफेक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे बोडणीमधील गटाने त्याच परिसरात मासेमारी करणाºया अन्य सहकाºयांशी संपर्क साधला. त्यानंतर काही कालावधीत अन्य बोटी तेथे आल्यानंतर दोन्ही गटामध्ये भरसमुद्रामध्य संघर्ष सुरू झाला. त्यानंतर रेवसमधील मासेमारी करणाºयांनी आक्षीच्या बोटींवर ताबा मिळवला आणि त्यांना पकडून मांडवा सागरी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी ते निघाले. ही बाब आक्षीमधील अन्य मासेमारी करणाºयांना कळताच. तेथील काही मासेमारी करणारे पूर्ण तयारी करून आपल्या सहकाºयांच्या मदतीला निघाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हे नाट्य समुद्रामध्ये सुरू होते. आक्षी आणि बोडणी परिसरातील दोन गटांंमध्ये संघर्ष झाल्याची माहिती मिळाली आहे. सदरची घटना १२ नॉटिकल माइल्सच्या बाहेर झाली असल्याने हे प्रकरण मुंबई यलोगेट पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.याबाबत भारतीय तटरक्षक दलाचे सहायक कमांडंट कृष्णा कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुट्टीवर असल्याचे सांगितले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मुरुड येथील तटरक्षक दलाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या हाणामारीचा पुढे काही परिणाम होतात हे सांगणे कठीण आहे. मात्र अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दोन गटांमध्ये संघर्ष झालेला आहे. ही घटना १२ नॉटिकल माइल्सच्या बाहेरची आहे. असे असले तरी, संबंधितांनी आमच्याकडे तक्रार दिल्यास ती घेतली जाईल. अद्यापही दोन्ही गटांच्या बोटी समुद्रामध्येच प्रवासात आहेत. त्यांना पोहोचण्यासाठी सुमारे सहा तासांचा अवधी लागेल. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.-अनिल पारस्कर,जिल्हा पोलीस अधीक्षक