विनयभंग प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार

By admin | Published: January 9, 2017 06:33 AM2017-01-09T06:33:24+5:302017-01-09T06:33:24+5:30

देशमुख कांबळे तर्फे बिरवाडी या गावामध्ये दोन गटांत शिवीगाळ व बाचाबाची होऊन महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत

Conflicting complaint in molestation case | विनयभंग प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार

विनयभंग प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार

Next

बिरवाडी/महाड : देशमुख कांबळे तर्फे बिरवाडी या गावामध्ये दोन गटांत शिवीगाळ व बाचाबाची होऊन महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख कांबळे या गावामध्ये ७ जानेवारी रोजी सकाळी फिर्यादी यांच्या घरात शिरून, महिलेला अश्लील शब्द प्रयोग करीत, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तर दुसऱ्या तक्रारीमध्ये फिर्यादी यांच्या वाड्याच्या शेजारील जागेत आरोपी हे कंपाऊंडचे काम करीत होते. भविष्यात कंपाऊंडच्या पाण्याच्या पोगाणीचा त्रास होऊ नये म्हणून फिर्यादी यांच्या पतीने आरोपीस विचारण्यास गेले असता, आरोपीने फिर्यादी यांचे पती यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरू के ले. म्हणून फिर्यादी व त्यांची सून गेल्या असता, यातील आरोपी नंबर १ यांनी फिर्यादी महिलेचा, तरआरोपी नंबर २ यांनी त्यांच्या सुनेचा विनयभंग केला व आरोपी नंबर ३ यांनी शिवीगाळ केली म्हणून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Web Title: Conflicting complaint in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.