कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या सोलनपाडा धबधब्यावर गतवर्षी २ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर, तालुक्यातील धरणे आणि धबधब्यांवर जाण्यासाठी प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला होता. आता पावसाळा सुरू झाल्याने सोलनपाडा डॅमसह तालुक्यातील अन्य धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. या धबधब्यांवर पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या रविवारीच पर्यटकांची मोठी गर्दी पाहवयास मिळाली. मात्र, गेल्या वर्षी प्रशासनाने लागू केलेला जमावबंदी कायदा आदेशाची यावर्षीही अंमलबजावणी होणार का? याबाबत मात्र पर्यटकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू झाला की, वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. उंचावरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते आणि मग निसर्गवेड्या पर्यटकांची पावले कर्जत परिसरात वळू लागतात. कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. यातच अल्पावधीत प्रसिद्ध झालेला सोलनपाडा धरण परिसर पर्यटकांच्या गर्दीचे ठिकाण झाले होते. मात्र, पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे कंटाळून ग्रामस्थांनी परिसरात पर्यटकांना बंदी घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्याच दरम्यान, सोलनपाडा येथे अनेक पर्यटकांचा अपघातात, मृत्यू झाल्याने गेल्या वर्षी १८ जुलैपासून पर्यटकांना येथे बंदी घातली होती. ही बंदी यावर्षीसुद्धा कायम आहे का? याबाबत अजून कोणतीही स्पष्टता करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सोलनपाडा डॅमचा धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, धबधब्यावर येणारे पर्यटक मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात. तर तोकड्या कपड्यांत वावरणाऱ्या महाविद्यालयीन तरु ण-तरु णींमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याची तक्र ार शेतकरी करत आहेत. त्यामुळे सोलनपाडा धबधब्यावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
धबधब्यांवरील बंदीबाबत संभ्रम
By admin | Published: June 27, 2017 3:19 AM