महाड/अलिबाग : केंद्र आणि राज्य सरकारला गेल्या पाच वर्षांत आलेल्या अपयशाच्या विरोधात काँग्रेसने सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा बुधवार, २३ जानेवारीला महाडमध्ये येत असून, यानिमित्त आझाद मैदानावर सकाळी ११ वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्यानंतर अलिबागमध्ये जनसंघर्ष यात्रा येणार असून बॅ.ए.आर. अंतुले भवन येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे.लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मिल्लकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.संघर्ष यात्रेचे सकाळी १० वा. पोलादपूर येथे आगमन होईल. त्यानंतर ही यात्रा महाडमध्ये येणार असून, शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे नेते अभिवादन करतील. यात्रेचे मुख्य बाजारपेठमार्गे आझाद मैदानावर आगमन होईल.
महाड, अलिबागमध्ये आज काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:02 AM