कॉग्रेसची पालिकेवर धडक; प्रदूषण, रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात आक्रोश

By वैभव गायकर | Published: November 17, 2023 02:44 PM2023-11-17T14:44:40+5:302023-11-17T14:45:59+5:30

नागरिकांना लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप करीत कॉग्रेसने पालिका प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.      

congress march on municipality against pollution roads water and waste problems | कॉग्रेसची पालिकेवर धडक; प्रदूषण, रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात आक्रोश

कॉग्रेसची पालिकेवर धडक; प्रदूषण, रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात आक्रोश

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल:पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या दि.17 रोजी पनवेल महानगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. नागरिकांना लागणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप करीत कॉग्रेसने पालिका प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.      

यावेळी  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान अहमद खान ,प्रभात झा ,तेजस घोलप, माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे,माजी नगरसेवक लतीफ शेख, शशिकांत बांदोडकर,विश्वजित पाटील,प्रितेश साहू,अभिजित पाटील,सुरेश पाटील,राहुल सावंत,काशीफ इमाम,शशिकला सिंग आदी उपस्थित होते.

पनवेल  महानगरपालिका क्षेत्रात पावसाळा  संपून अवघा महिना लोटला नाही त्यापुर्वीच पोदी, कामोठे, खारघर व बहुतांश ठिकाणी पाणी टंचाई सुरु झाली आहे. पनवेल महानारापालिका हद्दीतील रस्त्यांची दूरावस्था झाली आहे.महानगर गॅस च्या कामासाठी खोदलेले खड्डे असून देखील जैसे थे आहेत.पनवेल महानगरपलिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदूषणाचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे.पालिका हद्दीत समाविष्ट गावांना देखील विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या सर्व समस्यांवर जाब विचारण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह पालिकेवर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष  हेमराज म्हात्रे यांनी दिली.यावेळी कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांना निवेदन सादर केले.

Web Title: congress march on municipality against pollution roads water and waste problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल