जयंत धुळप।अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे विजयी झाल्याने राष्ट्रवादी भवन, काँग्रेस भवन आणि शेतकरी भवन येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याआधी एकमेकांचे कट्टर पारंपरिक विरोधक म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप लढले आहेत. मात्र, तटकरे यांच्या आजच्या विजयाने इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्ह्यामध्ये एक प्रकारे दिवाळीच साजरी केल्याचे चित्र होते.निवडणुका जाहीर झाल्यानंतर तटकरे यांच्या प्रचारासाठी प्रमुख नेत्यांनी रान पेटवले होते. प्रचार करताना ज्या ठिकाणी शेकापची सभा होती. त्या ठिकाणी काँग्रेसने जाणे टाळले होते, तर जेथे शेकापच्या सभा पार पडल्या, त्या ठिकाणी काँग्रेसने पाठ फिरवली होती. परस्परांच्या विरोधात राहून त्यांनी सर्वांनी आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा चंगच बांधला होता. तटकरे यांच्या प्रचारसभांना चांगलीच गर्दी होती.निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये चांगलीच गजबज दिसून आली होती.२१ एप्रिल रोजी निवडणुका पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी करण्यात आली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये कधी तटकरे पुढे तर कधी गीते मताधिक्य घेत होते. त्यामुळे प्रत्येक फेरीनंतर परस्परांच्या गोटात धाकधूक वाढत होती. भाजपविरोधी पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याचा फायदा होणार असे जिल्ह्यात वाटत होते. तसेच यावेळी घडले. १०व्या फेरीपर्यंत अशीच चुरस पाहायला मिळाली. ११व्या फेरीअखेर गीते यांनी सुमारे सात हजार मते अधिक मिळवली होती; परंतु तटकरे यांनी २०व्या फेरीपर्यंत गीतेंच्या सात हजार मताधिक्याला छेद देत तब्बल आठ हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर तटकरे यांनी मागे वळून पाहिले नाही.३० व्या फेरीमध्ये तटकरे यांनी ३१ हजार ४३८ मते अधिक घेत गीतेंचा पराभव के ला.तटकरे हे विजयी झाले आहेत. याचा अंदाज येताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची एकच आतशबाजी करून एकच जल्लोष केला. एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणाºया या राजकीय पक्षांनी विजयोत्सव साजरा केल्याचे पहिल्यांदाच घडले होते.>जिल्हात महाआघाडीची मोट ठरली फायद्याचीदेशात भाजपविरोधी पक्षांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून महाआघाडीची मोट बांधली होती. रायगड लोकसभा मतदारसंघामध्येही हीच स्थिती होती. एकेकाळचे परस्परांचे कट्टर विरोधक केवळ भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले होते. त्यांना येथे फायदा झाला.
तटकरेंच्या विजयाच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 1:31 AM