शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

रायगडमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 6:40 AM

रायगड जिल्ह्यातील मोजक्याच भागात असलेली ताकद वाढवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेण्याचे ठरवले आहे.

पेण : रायगड जिल्ह्यातील मोजक्याच भागात असलेली ताकद वाढवण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपचे कमळ हाती घेण्याचे ठरवले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये अण्णा हजारे यांचे उपोषण सोडवण्याच्या तयारीत असल्याने ते तेथून परतताच वर्षा बंगल्यावर प्रवेशाचा सोहळा पार पडेल.पेणमधील वैकुंठ निवास या त्यांच्या निवासस्थानातून सकाळीच शेकडो समर्थकांसह ते मुंबईला गेल्याने या राजकीय घडामोडींवर शिक्कामोर्तब झाले. पनवेलमध्ये ताकद वाढवल्यानंतर पेण विधानसभा मतदारसंघात ताकद वाढवण्याचे भाजपाचे प्रयत्न प्रत्यक्षात येतील आणि विधानसभेची गणिते बदलतील. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर या घडामोडींना वेग आल्याने ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये पाय रोवण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न फळास येण्याची चिन्हे आहेत. रविशेठ पाटील यांच्यावर जिल्हा पातळीवरील पक्षाची मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.राष्टÑवादी काँग्रेस- शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीला कडवा राजकीय विरोध करणारे म्हणून रविशेठ यांची ओळख आहे. हा राजकीय विरोध जपतानाच ते काँग्रेस पक्षापासून दूरावत गेल्याचे गेली दोन वर्षे दिसत होते. काँग्रेस पक्षावर दबावतंत्राचे राजकारण करत, प्रदेश काँग्रेसच्या बैठकांना गैरहजर राहत त्यांनी पक्षावरील नाराजी दाखवून देणे सुरू ठेवले होते. पेणमधील काँग्रेसच्या संघर्ष यात्रेकडे पाठ फिरवत त्यांनी बंडाच्या पवित्र्यात असल्याचे दाखवून दिले. राष्टÑवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी लोकसभेत काम करूनही विधानसभेत आघाडीधर्म पाळला जात नसल्याचा आक्षेप त्यांनी यापूर्वी जाहीरपणे घेतला होता.पेणमध्ये होणार शक्तिप्रदर्शनमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करण्याचा कार्यक्रम मुंबईत होणार असला, तरी त्यानंतर आपली ताकद दाखवून देण्यासाठी पेणमध्ये रविशेठ मोठा मेळावा घेत शक्तिप्रदर्शन करतील, अशी चर्चा आहे. त्यावेळी भाजपाचे विविध नेते उपस्थित राहतील, असे सांगितले जाते.

टॅग्स :congressकाँग्रेस