शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

महाराष्ट्र-गुजरातच्या नद्या जोडणार

By admin | Published: January 20, 2016 2:03 AM

पाणीप्रश्न निकाली काढण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरातच्या नद्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे.

पनवेल : पाणीप्रश्न निकाली काढण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरातच्या नद्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. भविष्यात पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी आतापासून नियोजन हाती घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केले. ओडिशा येथील कार्यक्रम आटपून रेल्वेमार्गे भारती पनवेलला आल्या होत्या. याठिकाणी विश्रामगृहात पत्रकारांशी सदिच्छा भेट घेतल्यावर त्या मुंबईला रवाना झाल्या. गंगा स्वच्छता अभियानावर दृष्टिक्षेप टाकताना भारती म्हणाल्या की, हे अभियान यशस्वी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आग्रही आहेत. गंगेच्या पात्रात स्वच्छता अभियान प्रभावीपणे हाती घेण्यात आले असून, दोन ते तीन वर्षांत नदी स्वच्छ होईल. गंगेच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याकडेही सरकार लक्ष देत असल्याचे भारती यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तापी नदीचे पाणी जमिनीत सोडण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येणार असून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणता येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचेही भारती यांनी सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्षा चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, बांधकाम सभापती राजू सोनी, पंचायत समितीचे सदस्य नीलेश पाटील, तहसीलदार दीपक आकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)आमदार प्रशांत ठाकूर हे युवा आमदार असून त्यांचे काम अतिशय चांगले असल्याचे सांगत उमा भारती यांनी कौतुकाची थाप दिली. त्याचबरोबर त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. भीमाशंकरला जाताना आपण एकदा पनवेलला थांबले होतो, त्यानंतर आता योग आल्याचे भारती यांनी सांगितले.