वैभव गायकर
पनवेल : रायगड जिल्ह्यात एकूण ६४ गड-किल्ले आहेत. यापैकी काही किल्ले राज्य पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित आहेत, तर काही केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित आहेत. मात्र, त्यानंतरही आणखी काही दुर्लक्षित लहान-मोठे गड आहेत. त्यांच्या देखभालीची जबाबदारी रायगड जिल्हाधिकाऱ्यांवर आहे; परंतु विविध कारणांमुळे हे गड दुर्लक्षित राहिले आहेत. या दुर्लक्षित गड-किल्ल्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आता संवर्धन केले जाणार आहे. प्रकल्प स्वराज्य अंतर्गत जिल्ह्यातील हे गड-किल्ले संरक्षित होणार आहेत.
या दृष्टीने जिल्हाधिकारी रायगड विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने प्रकल्प स्वराज्य तयार करण्यात आला आहे. गड-किल्ले संवर्धनासाठी श्री शिवसह्याद्री संस्थेने १५० पानांचा हा प्रकल्प तयार करून जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. महाराष्ट्राला गड-किल्ल्याचे वरदान प्राप्त झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेले हे गड-किल्ले काही प्रमाणात दुर्लक्षित झाले आहेत. शासनाकडून हव्या त्या पद्धतीने या गड-किल्ल्याचे संवर्धन झाले नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाºयांनीच यात पुढाकार घेतला आहे. त्यासाठी रायगड जिल्हा किल्ले संवर्धन व पर्यटन विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दुर्लक्षित किल्ले विकसित केले जाणार आहेत. याकरिता स्थापन केलेल्या प्रकल्प स्वराज्यनुसार पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन केले जाणार आहे. यामध्ये कर्नाळा, प्रबळगड, पेब (विकटगड), घोसाळा तसेच सरसगड आदीचा समावेश आहे.या किल्ल्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन केले जाणार आहे. यामध्ये किल्ल्याच्या पायवाटा सुधारणा, किल्ल्यावरील पाणथळी स्वच्छ करणार, पर्यटकांसाठी मार्गदर्शन, दिशादर्शक फलक उभारणार, स्थानिक लोकांना प्रक्रियेत सहभागी करून त्यांना प्रशिक्षण देऊन पर्यटन विकासाला चालना देण्याचे काम केले जाणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, गड-किल्ले आदीचा विकास करून पर्यटनवाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, याचा ऊहापोह या प्रकल्प स्वराज्यमध्ये करण्यात आला आहे. श्री शिवसह्याद्री संस्थेचे अध्यक्ष रोहित काटकर व संस्थापक सदस्य सागर मुंडे यांनी जून २०१९ मध्ये हा प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे.जिल्हाधिकाºयांनीही या प्रकल्पाची स्तुती केली आहे.रायगड जिल्हा किल्ले संवर्धन व पर्यटन विकास समिती याकरिता विविध कंपन्यांचे सीएसआर फंडचा निधीदेखील उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी नियुक्त केलेले प्रतिनिधी संबंधित कंपनीला या प्रकल्पांतर्गत माहिती देणारआहेत. डिसेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात नेमलेल्या पाच किल्ल्यांतील एका किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन१प्रकल्प स्वराज्यनुसार पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन केले जाणार आहे. यामध्ये कर्नाळा, प्रबळगड, पेब (विकटगड), घोसाळा तसेच सरसगड आदीचा समावेश आहे. या किल्ल्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन केले जाणार आहे.२किल्ल्याच्या पायवाटा सुधारणार, किल्ल्यावरील पाणथळी स्वच्छ करणार, पर्यटकांसाठी मार्गदर्शन, दिशादर्शक फलक उभारणार, स्थानिक लोकांना प्रक्रियेत सहभागी करून त्यांना प्रशिक्षण देऊन पर्यटन विकासाला चालना देण्याचे काम केले जाणार आहे. डिसेंबर महिन्यात या कामाला सुरुवात होणार आहे.